भोसरी जमीन घोटाळा प्रकरण: मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने एकनाथ खडसेंच्या पत्नी आणि याप्रकरणातील आरोपी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
भोसरी जमीन घोटाळा प्रकरण: मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा
भोसरी जमीन घोटाळा प्रकरण: मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासाSaam Tv

मुंबई : पुण्यामधील भोसरी जमीन घोटाळा pune bhosari land case प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने एकनाथ खडसेंच्या Eknath Khadse पत्नी आणि याप्रकरणातील आरोपी मंदाकिनी खडसे Mandakini Khadse यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तसेच त्यांच्याविरोधामध्ये अजामीनपात्र वॉरंट देखील जारी करण्यात आले होते.

मात्र, आता या प्रकरणी मंदाकिनी खडसेंना मुंबई हायकोर्टाचा mumbai high court दिलासा मिळाला आहे. पुण्यामधील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी तूर्तास अटक न करण्याचे ईडीला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तपास यंत्रणेला या तपासामध्ये सहकार्य करण्याचे निर्देश देखील खडसेंनी देण्यात आले आहे.

हे देखील पहा-

दरम्यान या काळात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेर राहण्याचे मंदाकिनी खडसेंना निर्देश आले आहेत. या काळात अटक झाल्यास ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहे. दरम्यान भोसरी जमीन घोटाळ्याच्या खटल्यात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे पीएमएलए PMLA कोर्टाकडून मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देता यावे याकरिता ३ आठवड्यांची स्थगिती खडसेंच्या वतीने मागण्यात आली होती.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरण: मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा
भक्तानेच केला भोंदुबाबाचा भांडाफोड: लाखो रुपये उकळणारा भोंदूबाबा जेरबंद

मात्र, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली होती. एकनाथ खडसेंना मात्र, याप्रकरणी कोर्टाने तात्पुरता वैद्यकीय कारणास्तव दिलासा देण्यात आला होता. प्रकृती अस्वस्थ्यामुळे एकनाख खडसे हे सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले आहे. याची दखल घेत कोर्टाने प्रकरणाची सुनावणी 21 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com