शिवसेना नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांना मोठा धक्का, समर्थकांना पदावरुन हटवलं

शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पालकमंत्री अनिल परब यांच्या पाठीमागे ठामपणे असल्याचे सिद्ध झाले आहे.
शिवसेना नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांना मोठा धक्का, समर्थकांना पदावरुन हटवलं
शिवसेना नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांना मोठा धक्का, समर्थकांना पदावरुन हटवलंSaam Tv

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पक्षातील रामदास कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवत, शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पालकमंत्री अनिल परब यांच्या पाठीमागे ठामपणे असल्याचे सिद्ध झाले आहे. (Big blow to Shiv Sena leaders Ramdas Kadam and Yogesh Kadam, supporters were removed from office)

हे देखील पहा -

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युतीची शक्यता असून शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि खासदार सुनिल तटकरे यांच्यात स्थानिक निवडणुकां संदर्भात झाली चर्चा झाली आहे. शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam, Shivsena) यांना त्यांचे वादग्रस्तं ऑडियो क्लिप प्रकरण आता चांगलेच भोवल्याचं दिसून येतंय. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांच्या समर्थकांना हटवून, तात्काळ त्यांच्या पदांवर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्यात. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना मोठा झटका मिळाला आहे.

शिवसेनेत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जागा नाही हे पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी ठामपणे दाखवून दिल्याचीही चर्चा सध्या शिवसेनेत सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र भाजप विरोधात लढतील या संदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थानिक खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्याशीही चर्चा झाल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांना मोठा धक्का, समर्थकांना पदावरुन हटवलं
बेस्ट बसच्या प्रवासासाठी बसपास आणि दैनंदिन तिकीटामध्ये सुपर सेव्हर योजना...

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या:

1) राजू निगुडकर, - उपजिल्हाप्रमुख, उत्तर रत्नागिरी

2) किशोर देसाई, - विधानसभा क्षेत्रप्रमुख, दापोली विधानसभा

3) ऋषिकेश गुजर, - तालुकाप्रमुख, दापोली तालुका

4) संतोष गोवले, - तालुकाप्रमुख, मंडणगड तालुका

5) संदीप चव्हाण, - शहरप्रमुख, दापोली शहर

6) विक्रांत गवळी, - उपशहरप्रमुख, दापोली शहर

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com