TET घोटाळा प्रकरण; तब्बल ७ हजारांहून अधिक उमेदवारांवर कायमची परीक्षा बंदी

बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
TET Exam
TET Exam Saam Tv News

पुणे : टीईटी घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. टीईटी घोटाळ्याप्रकरणी परीक्षा परिषदेने बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या घोटाळ्यातील तब्बल ७ हजार ८८० बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. या बोगस शिक्षकांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. (TET Scam Latest Marathi News)

TET Exam
Maharashtra Politics : शिवसेना नेमकी कुणाची? राज्यातील सत्तासंघर्षावर आज 'सुप्रीम' सुनावणी

टीईटी घोटाळा प्रकरणाची बातमी सर्वात आधी साम टीव्हीने दाखवली होती. इतकंच नाही तर, साम टीव्हीने या घोटाळ्याचा वारंवार पाठपुरवठा देखील केला होता. आता साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत परीक्षा परिषदेने तब्बल ७ हजारांहून अधिक बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

२०१९-२० मध्ये टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर पुणे सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चौकशी करण्यात आली. चौकशीतून जे समोर आलं ते धक्कादायक होतं. तब्बल ७ हजार ८८० उमेदवार गैरप्रकारात सहभागी असल्याचं समोर आलं आता या बोगस शिक्षकांना घरी पाठवलं जाणारं आहे. (TET Scam Latest News)

TET Exam
Maharashtra Politics News : शिंदे सरकारचं काय होणार? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणतात...

दरम्यान, पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले होतं. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. तुकाराम सुपे यांना 17 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील सायबर पोलिसांनी अटक केली होती. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्यात सुपेला जामीन मिळाला.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com