बिटकॉईन फसवणूक प्रकरणी अटकेत असलेल्या सायबर तज्ञांच्या घरी मिळाले, मोठे डिजिटल पुरावे

पंकज घोडेच्या घर व कार्यालयातील झडतीत तीन हार्डडिक्स, दोन टॅब, दोन लॅपटॉप, चार सीडी, सहा पेनड्राईव्ह, तीन स्मार्ट वॉच, 21 एटीएम कार्ड, 11 पेनड्राईव्ह, एक आयपॅड, दोन टॅब,6 हार्डडिक्स, 9 डायर्‍या, चार डिव्हीडी, ट्रेझर वॉलेट, मेमरी कार्ड आणि एक संगणक जप्त करण्यात आला आहे.
Bitcoin
BitcoinSaam TV

प्राची कुलकर्णी -

पुणे : बिटकॉईन या आभासी चलनाच्या फसवणुक पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केलेल्या दोन्ही सायबर तज्ञानी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वॉलेटवर पाठविलेले बिटकॉईन परत मिळविण्यासाठी त्यांच्याकडे संबंधित बिटकॉईन (Bitcoin) व्यवहाराचा पासवर्डसाठी कसुन चौकशी करण्यात आली आहे. तसेच दोघांच्या कार्यालयाची, घरांची झडती घेत पोलिसांनी महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत. या माहितीच्या आधारे गैरव्यवहाराची व्याप्ती पुढे येऊ शकणार आहे.

बिटकॉईन फसवणुकीच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या तपासासाठी तांत्रिक तज्ञ म्हणून मदत करण्याच्यानिमित्ताने पुढे आलेल्या सायबर तज्ञ पंकज प्रकाश घोडे (Cyber ​​expert Pankaj Prakash Ghode) (रा. ताडीवाला रोड) व रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) यांनीच पोलिसांनी बिटकोईनबाबत दिलेल्या डेटाचा गैरवापर करून कोट्यवधी रूपयांच्या बिटकॉईनचा अपहार केला. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी दोघाना अटक केली असून त्यांना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

घर व कार्यालय झडतीत मिळाले मोठे डिजीटल पुरावे

पोलिसांनी पंकज घोडेच्या घर व कार्यालयातील झडतीत तीन हार्डडिक्स, दोन टॅब, दोन लॅपटॉप, चार सीडी, सहा पेनड्राईव्ह, तीन स्मार्ट वॉच, 21 एटीएम कार्ड, दोन ओळखपत्र, चेकबुक, पासबुक, आयपॅड, डब्ल्यूडीसी कंपनीची कागदपत्रे, आठ डायर्‍या जप्त केल्या आहेत. तर पाटीलच्या घर व कार्यालयाच्या झडतीत 4 लॅपटॉप, बारा मोबाईल, अकरा पेनड्राईव्ह, एक आयपॅड, दोन टॅब,सहा हार्डडिक्स, 9 डायर्‍या, चार डिव्हीडी, ट्रेझर वॉलेट, मेमरी कार्ड आणि एक संगणक जप्त करण्यात आला आहे.

आरोपीकडुन चोरलेल्या बिटकॉइनचा पोलिसांकडून तपास

Bitcoin
महाजनांनंतर फडणवीसांचा नंबर, मी चव्हाणांना देव मानायचो; तेजस मोरेचे धक्कादायक खुलासे (पहा Video)

दत्तवाडी पोलिस ठाण्यात (Dattawadi Police Station) दाखल गुन्ह्यातील आरोपींद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे घोडे, पाटील यांनी आरोपीच्या बिटकॉइन वॉलेटवरील बिटकॉईन व विविध प्रकारची क्रिप्टोकरन्सी ही विविध वॉलेटवर वर्ग केल्याचे उघड झाले असून त्यामध्ये कोट्यवधींचा अपहार झाला आहे. संबंधित वॉलेटवर बिटकॉईन व क्रिप्टोकरन्सी वर्ग करण्यात आली आहेत त्या वॉलेटची माहिती दोघांकडून पोलिस घेत आहे. दोघांनी बिटकॉईन, बिटकॉईन कॅश, इथर अशा विविध स्वरूपातील क्रिपटोकरन्सीचा अपहार विविध वॉलेटवर केला आहे, त्यासाठी त्यांनी ठराविक पासवर्डचा वापर केला असून त्याची चौकशी पोलिस करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com