Dawood: डी कंपनीला मोठा धक्का; NIA ने दाऊदचा हस्तक 'सलीम फ्रूट'ला केली अटक

D Company Dawood Latest News: 2006 मध्ये UAE मधून सलीम फ्रूटची हकालपट्टी करण्यात आली आहे. तो छोटा शकीलसाठी खंडणी वसूल करायचा.
D Company Dawood Latest News
D Company Dawood Latest NewsSaam TV

मुंबई: गुन्हेगारी जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) दाऊदचा (Dawood) हस्तक इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याला मुंबईतून अटक केली आहे. इक्बाल कुरेशी हा डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांसाठी, दहशतवादी निधी उभारण्यासाठी, मालमत्ता व्यवहार आणि वाद मिटवण्याचे काम करुन छोटा शकीलच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात सक्रिय भूमिका बजावत होता असा त्याच्यावर आरोप आहे. (Mumbai Crime News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा साडू आहे. PMLA ने याआधी सलीम फ्रूटचं स्टेटमेंटदेखील नोंदवलं आहे. छोटा शकीलच्या पाकिस्तानच्या घरी सलीम तीन ते चार वेळा गेल्याची देखील माहिती आहे. 2006 मध्ये UAE मधून सलीम फ्रूटची हकालपट्टी करण्यात आली आहे. तो छोटा शकीलसाठी खंडणी वसूल करायचा. 2006 मध्येही त्याला अटक करण्यात आली होती. (NIA arrests Chota Shakeel's associate Salim Fruit in Mumbai)

D Company Dawood Latest News
आमदार भरत गोगावले आणि त्यांचा मुलगा विकास गोगावले यांना जीवे मारण्याची धमकी

सलीम फ्रूटवर अनेक गुन्हे दाखल आहेत. इतकेच नव्हे तर सलीमवर मोक्का देखील लावण्यात आला होता. सलीम फ्रूट हा हसीना पारकरचा निकटवर्तीय होता. हसीना पारकर दाऊद इब्राहिमची बहीण होती. हसीना पारकरला सेटलमेंटच्या धंद्यात सलीम फ्रूट मदत करायचा. आता एनआयएनने त्याला अटक केल्यानंतर दाऊदच्या डी कंपनीला मोठा धक्का बसणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com