RBI Policy : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा मोठा दणका; होम लोन EMI वाढणार

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण, ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईच्या झळा आता आणखी तीव्र होणार आहे.
RBI Repo Rate
RBI Repo RateSAAM TV

RBI Hike Repo Rate : सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण, ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईच्या झळा आता आणखी तीव्र होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आज त्यांच्या चलनविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार आता रेपो दरात (Repo Rate) 50 बीपीएस पॉईंट म्हणजे 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आता सामान्यांना ईएमआय वाढीला सामोरे जावे लागणार आहे. (RBI Repo Rate Latest News)

RBI Repo Rate
CM शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये जोरदार भांडण? सूत्रांची साम टिव्हीला माहिती

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रेपो दरातील वाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार असल्याचेही दास यांनी म्हटले आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार असून, सामान्यांचे आर्थिक गणित बिघणार आहे. दरम्यान, वाढीच्या निर्णयानंतर रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर आला आहे. जो पूर्वी 5.40 टक्क्यांवर होता.

रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय सेंट्रल बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. विशेष बाब म्हणजे मे महिन्यापासून रेपो दरात सलग चार वेळा वाढ करण्यात आली आहे. मेपासून रेपो दर 1.90 टक्क्यांनी वाढला आहे.

यूएस फेड रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदरात 75 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती, त्यानंतर रुपयावर दबाव वाढला होता. तसेच ऑगस्टमध्ये किरकोळ महागाईत पुन्हा वाढ झाली होती. अशा परिस्थितीत आरबीआय शुक्रवारी रेपो दरात वाढ करण्याची घोषणा करू शकते, असा विश्वास अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

रेपो दर म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे ज्यावर आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते. त्याला रिप्रोडक्शन रेट म्हणतात. रेपो रेट कमी म्हणजे बँकेकडून सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील. म्हणजेच कमी रेपो रेटमुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज हे सर्व स्वस्त होते. पण, यामुळे तुमच्या ठेवीवरील व्याजदरही वाढतो. त्याचप्रमाणे त्याच्या वाढीमुळे सर्व प्रकारची कर्जे महाग होतात.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com