Mumbai Corona Case : दिलासादायक! मुंबईत तब्बल 3 वर्षानंतर शून्य कोरोनाबाधितांची नोंद

No Covid Cases In Mumbai : तब्बल 34 महिन्यानंतर मुंबईमध्ये शून्य कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Corona
CoronaSaam Tv

Mumbai Corona Cases News : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत तब्बल 3 वर्षानंतर शून्य कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 16 मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये एकाही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे मुंबईतून करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपुष्टात येत असून, मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Corona
Video : मुंबईत बेस्ट बसला आग; प्रसंगावधान राखत प्रवासी उतरल्याने मोठा अनर्थ टळला

मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune)दोन वर्षापूर्वी कोरोनाचा स्फोट झाला होता, त्यामुळे राज्याच्या चिंतेत वाढ झाली होती. गर्दीच्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. पण आज मुंबई शहरात एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही.

मुंबईमध्ये करोनाचा पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये सापडला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. मात्र, पालिकेने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव यशस्वीपणे आटोक्यात आला आहे

Corona
Viral Video: जेव्हा मंत्रीसाहेब संतापतात! चिडलेल्या मंत्र्यांनी थेट कार्यकर्त्यांवरचं केली दगडफेक, पाहा नेमकं काय झाल?

सध्या मुंबईत सक्रिय रुग्ण किती?

मुंबईत सध्या 23 सक्रिय रुग्णांची संख्या २३ इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 11 लाख 54 हजार 317 इतक्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 11 लाख 34 हजार 547 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर मुंबईत आतापर्यंत एकूण 19,747 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मंगळवारी आठ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com