NIA छापेमारीनंतर अजित पवार थेट बोलले; म्हणाले, देशद्रोही लोकांवर...

'नवाब मलिकांची चौकशी पुर्ण होऊद्या, चौकशी करण्याआधी संबंध जोडू नका, '
NIA छापेमारीनंतर अजित पवार थेट बोलले; म्हणाले, देशद्रोही लोकांवर...
Ajit PawarSaam Tv

पुणे : आज सकाळपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मुंबई आणि मुंबई आसपासच्या परिसरात २४ ठिकाणी छापेमारी केली असून या छापेमारीत 'एनआयए'ने मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, शस्त्रसाठ्यासह संशयित कागदपत्र जप्त केली आहेत. तसंच हा मोठ्या प्रमाणात जमा झालेला पैसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांना (International Terrorist Organizations) पुरवला जात असल्याचा दावा देखील NIA ने आपल्या प्रेस रिलीजमध्ये केला होता.

याच पार्श्वभूमिवर पत्रकारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, देशद्रोही लोकांच्या बाबतीत काम करणं, चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या देशद्रोही लोकांवर धाडी टाकणं, देशाच्या सुरक्षेला हानी पोहचविणाऱ्या लोकांवर कारवाई करण हे एनआयए'चे काम आहे. शिवाय अशा देशद्रोही लोकांवर, देशाच्या सुरक्षेला हानी पोहचविणाऱ्यांवर कारवाई करायलाच हवी त्यांना उघडं पाडायलाचं हवं असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
'तो' पैसा दहशतवादी संघटनांनी वापरला; NIAचा मोठा खुलासा

दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या केस संदर्भात देखील भाष्य केलं. मलिकांची आधी चौकशी पुर्ण होऊद्या, चौकशी करण्याआधीच संबंध जोडू नका, मी आधीच सांगितले आहे. चुकीचे कुणीच वागू नये असं पवार म्हणाले. तर सकाळपासून मुंबईत एनआयएने छापासत्र सुरु केले या प्रकरणामध्ये पोलिसांनी माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी (Suhail Khandwani) यांची एनआयएने तब्बल १३ तास चौकशी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.