
डोंबिवली - शिवसेना ज्येष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी ही भाजपची खेळी असल्याचं सांगत भाजपला (BJP) लक्ष केलं आहे. ही सगळी खेळी भाजप छुप्या पद्धतीने खेळत आहे.जिकडे त्यांचं सरकार आहे. तिकडेच विमान घेवून जातात,त्यांच्याच पोलिस संरक्षणात आमदाराना घेवून जातात.
आसामला स्पेशल फ्लाईटने घेवून जातात, केंद्रीय सुरक्षा दलाच्या गराडा त्या ठिकाणी आणि पोलिसांच्या दबावा मध्ये आमदारांना ठेवण्यात आलं आहे. म्हणजेच कुठेतरी भारतीय संविधानाची पायमल्ली करायची ही भाजपची भूमिका आहे त्याच भूमिकेतून या आमदारांचे अपहरण केलं असल्याचा आरोप तपासे यांनी केला.
हे देखील पाहा -
महेश तपासे आज डोंबिवली येथील पालिका मुख्यालयातील पत्रकार पक्षात आले होते. त्यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून भाजपला लक्ष केलं. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्वादीबाबत नाराजी व्यक्त केली याबाबत बोलताना तपासे यांनी २०१९ मध्ये माहाविकास आघाडी झाली तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्राम च अजेंडा होता. त्यानुसार अडीच वर्ष सरकार चाललं. दोन वर्ष कोरोनाध्ये गेली. या अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी विविध योजना व आमदारांना भरघोस निधी दिला. त्यामुळे कुणावर अन्याय झाला अशी परिस्थिती नाही. जो पेच प्रसंग निर्माण झाला आहे. तो अंतर्गत विषय असला तरी तो मार्गी लागेल.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे निष्ठावान नेते आहेत ते पून्हा येतील अशी अपेक्षा व्यक्त केली पुढे बोलताना तपासे यांनी भाजप सोबत जर सत्ता स्थापन करायची असती तर ती २०१९ साली झाली असती. भाजपने ठाकरे यांना दिलेला शब्द फिरवला त्यानंतर महवीकास आघाडी सरकार स्थापन झालं. शिवसेना प्रमुख पदावर यावी अशी भाजपची आजही इच्छा नाही ,ही सगळी खेळी भाजप छुप्या पद्धतीने खेळत आहे. जिकडे त्यांचं सरकार आहे. तिकडेच विमान घेवून जातात. त्यांच्याच पोलिस संरक्षणात आमदाराना घेवून जातात.
आसामला स्पेशल फ्लाईट ने घेवून जातात. केंद्रीय सुरक्षा दलाच्या गराडा त्या ठिकाणी आणि पोलिसांच्या दबावा मध्ये आमदारांना ठेवण्यात आलं आहे. म्हणजेच कुठेतरी भारतीय संविधानाची पायमल्ली करायची ही भाजपची भूमिका आहे त्याच भूमिकेतून या आमदारांचे अपहरण केलं असल्याचा आरोप केला.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय आहे याबाबत बोलताना तपासे यांनी काल दिल्लीतील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. हा विषय शिवसेनेने हाताळावा आम्ही शिवसेनेसोबत आहोत. काँगेस ची देखील हीच भूमिका आहे. भाजपच्या या प्रयत्नाला यश मिळणार नाही भाजप डाव उलटून पडले गेलेले सर्व आमदार पुन्हा स्वघरी येतील अशी अपेक्षा व्यक्त केली. पुढे बोलताना सरकार अजिबात डळमळीत झालेलं नाही जी लोकं नाराज होवून गेली असतील ते पुन्हा परततील, शिवसेना त्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपाला सरकार पाडण्यात यश मिळणार नाही असा दावा केला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.