पर्यायी सरकार देण्यावर भाजपचे एकमत; दिल्लीत खलबतं करुन फडणवीस मुंबईत

सरकार बनवण्यासंदर्भात येणाऱ्या कायदेशीर अडचणीवर मात करण्याबद्दल पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा.
Maharashtra Political Crisis | Devendra Fadnavis
Maharashtra Political Crisis | Devendra FadnavisSaam TV

सुशांत सावंत -

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून मुंबईत दाखल झाले असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पर्यायी सरकार देण्यावर भाजपचे एकमत झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदारांचा आकडा सातत्त्याने वाढत आहे. कालपर्यंत शिवसनेचे ४० आणि अपक्ष १० अशा एकूण ५० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे भाजपशी (BJP) हातमिळवणी करुन शिंदे हे सरकार स्थापन करु शकतात अशा चर्चा सुरु होत्या.

अशातच आम्ही आता कायदेशीर लढाईला सुरुवात केली असून, शिंदे गडाकडे असलेले संख्याबळ हे फक्त कागदावरील आहे. त्यांची खरी कसोटी मुंबईला आल्यावर असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. ते म्हणाले, 'आज बाळासाहेबावरच्या श्रद्धेची निष्ठेची कसोटी, बहूमताचा आकडा हा चंचल असतो, बंडखोर आमदार मुंबईत आल्यावरच खरी कसोटी लागेल, शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पश्चाताप होईल असं राऊत म्हणाले आहेत.

हे देखील पाहा -

त्यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेकडून शिंदे गटावर दबाव टाकण्यात येत आहे. अशातच राजकीय पाऊल सावधगिरीने टाकणारे देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदेशीर मार्गाचा धोका ओळखत आधीच भाजपचे जेष्ठ नेते तथा गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत सरकार बनवण्यासंदर्भात येणाऱ्या कायदेशीर अडचणीवर मात करण्याबद्दलची चर्चा केली असल्याची माहिती आता सुत्रांकडून मिळत आहे.

त्यामुळे शिवसेने जरी १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचं सांगितलं असलं तरीही त्यावरती आता शिंदेगट काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचं आहे. शिवाय 'निलंबित करण्याची धमक्या आम्हाला देऊ नका, कायदा आम्हाला देखील कळतो.' अशा आशयाचं ट्विट एकनाथ शिंदे यांनी काल केलं होतं.

त्यामुळे सत्ताधारी आणि बंडखोर दोन्ही आपापली कायदेशीर बाजू मजबूत करण्याच्या मागे लागले असताना फडणवीस यांची कालची दिल्ली भेट महत्वपुर्ण मानली जात आहे. दरम्यान, जर हे सरकार कोसळलं तर भाजप पर्यायी सरकार दिल्यास नवे सरकार येऊ शकतं त्यानुसार मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असू शकतात असं देखील सुत्रांच्या माहितीनुसार समजतं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com