'शिल्पकार नव्या पुण्याचे' ला 'कारभारी लयभारी' चे प्रत्युत्तर
शिल्पकार नव्या पुण्याचे' ला 'कारभारी लयभारी' चे प्रत्युत्तर saam pune

'शिल्पकार नव्या पुण्याचे' ला 'कारभारी लयभारी' चे प्रत्युत्तर

पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची जोरदार पोस्टरबाजी

अमोल कविटकर

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवरुन पुण्यामध्ये चांगलेच राजकारण तापले आहे, येत्या 22 जुलैला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे ,या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीने शहरात जोरदार बॅनरबाजी  केली आहे. या होर्डिंगवरुन भाजप आणि राष्ट्रवादीच्या नव्या वादाचा पुढचा अंक सुरु झालाय. देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पुणे शहर भाजपने होर्डिंगवर फडणवीस यांचा उल्लेख शिल्पकार नव्या पुण्याचे असा केला आहे आणि यावरच राष्ट्रवादीनने आक्षेप घेत अजित पवारांचे होर्डिंग लावून कारभारी लयभारी चे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हेदेखील पहा

आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका election लक्षात घेता आपला नेता किती पावरफूल आहे हे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जणू चढाओढ लागली आहे. शहरातल्या सगळ्या प्रमुख चौकांमध्ये अजित पवार ajit pawar आणि देवेंद्र फडणवीस यांचे भलेमोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं होर्डिंग कॅम्पेन केले त्याची टॅगलाईन आहे शिल्पकार नव्या पुण्याचे अशी आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या वाढदिवसाचे जे कॅम्पेन केले आहे त्याची टॅगलाईन आहे कारभारी लय भारी अशी आहे.

भारतीय जनता पक्षाने फडणवीस यांना शुभेच्छा देताना केलेल्या उल्लेखावर राष्ट्रवादीने आक्षेप घेत टीकेची झोड उठवली सुरुवातीला पुण्यातील असलेल्या आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टिकेचे ट्विट केले, त्यानंतर लगेचच या वादात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेत भाजपला लक्ष्य केले.

शिल्पकार नव्या पुण्याचे' ला 'कारभारी लयभारी' चे प्रत्युत्तर
साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत शिवसेनेने केली शेतकऱ्याला मदत...

विशेष म्हणजे फडणवीस fadanviis यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग hordings नको, असं आवाहन भाजप प्रदेश कार्यालयाकडून करण्यात आले, मात्र आवाहन करण्याआधीच पुणे भाजपचे होर्डिंग झळकले होते... पुणे महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहेत. त्यातही पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच तगडी लढाई असेल. त्यामुळेच कोणताही विषय समोर आला तर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद झाला नाही, तरच नवल

Edited by Ashwini jadhav kedari

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com