'आम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींसोबत गेलो', कारण...-फडणवीस

औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होत असतानाच दुसरीकडे मुंबईमध्ये सोमय्या मैदानावर भाजपची बुस्टर डोस सभा होत आहे.
'आम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींसोबत गेलो', कारण...-फडणवीस
Devendra FadnavisSaam Tv

मुंबई: औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची (Raj Thackeray) सभा होत असतानाच दुसरीकडे मुंबईमध्ये सोमय्या मैदानावर भाजपची बुस्टर डोस सभा (BJP Booster Dose Rally) होत आहे. भाजपच्या पोलखोल सभेचा आज समारोप होत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूका लक्षात घेता या सभेला महत्त्व आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थीत सभा पार पडत आहे. फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उचलून धरला. भाजपने मेहबुबा मुफ्तींसोबत सरकार का स्थापन केले हे सांगितले.

आम्ही काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत गेलो. पाकिस्तानला आम्ही सांगितले बघा आम्ही सत्ता स्थापन करू शकतो. पण त्याचवेळी पाठींबा काढून आम्ही मेहबूबा मुफ्तींना खाली खेचले. या देशात एकच वाघ तयार झाला ते म्हणजे नरेंद्र मोदी (Narendra Modi). मोदींनी सांगितले कलम 370 जाईल. काल कुणीतरी काश्मीरमध्ये गेलं आणि म्हणाले चौपाटी सारखी गर्दी दिसली. आम्हाला म्हणतात पाकिस्तान सोबत काय बोलता चीन बद्दल बोला की अरे पण तुम्ही आम्हाला काय सांगता. ज्यांनी चीनला जमीन दिली त्यांच्या मांडीला माडी लावून बसलात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Devendra Fadnavis
मी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी होतो, तुम्ही कुठे होता?- फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन भाषणाला सुरुवात केली. काही लोकांना वाटतं हा महाराष्ट्र म्हणजे त्यांचा आहे परंतु हा महाराष्ट्र १८ पगड जातीचा आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचाही फडणवीसांनी समाचार घेतला. मी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी होतो, तुम्ही कुठे होता. हा देवेंद्र फडणवीस 17 दिवस सेंट्रल जेलमध्ये होता. बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसेनेचा नेता गेला नाही. बाबरी पाडली तेव्हा आरोप कुणावर झाले तर भाजपच्या नेत्यांवर असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या सभेमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे आदी भाजप नेते उपस्थीत होते. मागच्या दोन वर्षांपासून आघाडी सरकार राज्याला मागे नेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे. या सभेमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चार प्रश्न विचारले आहेत. ईद राष्ट्रीय कधीपासून झाला? अक्षय तृतीयेला गावागावात शिवजयंती का साजरी होत आहे? तुम्ही शाहिस्तेखानाची बोटे आपोआप तुटली हे सांगणार आहेत का? असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.