भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवून जिंकू शकते: चंद्रकांत पाटील

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांनी आज अर्ज दाखल केले.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSaam TV

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेना (Shivsena) पुरस्कृत उमेदवारी देण्याच्या अटीवरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता भाजपच्या (BJP) चंद्रकांत पाटील यांनी तिसऱ्या जागेवरुन दावा केला आहे. भाजप तिसरी जागा लढवून जिंकेलही असा आत्मविश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर प्रदेश भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकेलही असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला. चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.

Chandrakant Patil
आनंदाची बातमी! मान्सूनची आगेकूच,महाराष्ट्रात कधी?

चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपचे (BJP) विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजप तिसरी जागा लढवून जिंकू शकते. या निवडणुकीच्या बाबतीत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असल्याने त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई होईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेनेने काय करावे हा त्यांचा प्रश्न

शिवसेनेने या निवडणुकीत काय करावे हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण राज्यसभा निवडणुकीत प्राधान्यक्रमाच्या मतदानाच्या पद्धतीमुळे दोन उमेदवार लढविण्याच्या प्रयत्नात कधी कधी मुळ उमेदवार पराभूत होतो, हे ध्यानात घ्यावे, असे ते म्हणाले.

Chandrakant Patil
गृहिणी होणं कोल्हापूरहून पुण्यात येण्याइतकं सोपं नसतं; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या निवासस्थानावर ईडीने टाकलेल्या धाडीवर बोलताना पाटील म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा संविधानाच्या चौकटीत स्वतंत्रपणे काम करत आहेत. त्याविषयी आपण टिप्पणी करणार नाही.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होत नसल्याचे पाहून जयश्री पाटील उच्च न्यायालयात गेल्या. त्यांच्या अर्जाच्या आधारावर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला व कारवाई झाली हे विसरता येणार नाही. न्यायालयाचा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईबाबत शिवसेनेला काही गैर वाटत असेल तर त्यांनी न्यायालयाकडे दाद मागावी, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com