Chandrakant Patil Exclusive : ...तर मी ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

Chandrakant Patil News : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी एकत्र आले पाहिजे. मला आदेश आल्यास दोघांना एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईल'
Chandrakant Patil On Uddhav Thackeray Eknath Shinde
Chandrakant Patil On Uddhav Thackeray Eknath Shinde Saam TV

Chandrakant Patil Exclusive : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी एकत्र आले पाहिजे. मला आदेश आल्यास दोघांना एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईल, असं मोठं विधान भाजप नेते तसेच राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. साम टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. (Maharashtra Political News)

एकनाथ शिंदे ४० यांनी आमदारांसह शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. एकाचवेळी शिवसेनेचे ४० आमदार फुटल्याने महाविकासआघाडीचे बहुमत कमी झाले. परिणामी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठींबा घेत राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन केलं.

Chandrakant Patil On Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav thackeray Vs Devendra Fadnavis: भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितला 'फडतूस' शब्दाचा अर्थ, म्हणाले...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) इतक्यावर थांबले नाही, तर त्यांनी निवडणूक आयोगासमोर आपलीच शिवसेना खरी असा दावा केला. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना शिवसेनेवर दावा सांगणारे लेखी स्वरूपातील कागत्रपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. दोन्ही बाजूंची कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं. तेव्हापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा राजकीय वाद पेटला.

दरम्यान, शिंदे आणि ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते दररोज एकमेकांवर टीकेचा भडीमार करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन हिंदुत्व सोडलं, अशी टीका करत आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते शिंदे गटातील नेत्यांना गद्दार म्हणून संबोधत आहेत. अशातच, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे आणि शिंदे यांना पुन्हा एकत्र आणण्याचं विधान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी एकत्र आले पाहिजे. मला आदेश आल्यास दोघांना एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईल", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचबरोबर "निकालावर टिपण्णी करणे योग्य नाही . जे टिपण्णी करतात त्यांना सांगणं आहे की न्यायव्यवस्था आहे त्यावर टिपण्णी करणं योग्य नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यावर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल. जे थांबले आहेत ते येतील", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Chandrakant Patil On Uddhav Thackeray Eknath Shinde
Heart Attack Death : औषध विक्रेत्याला दुकानातच हार्ट अटॅक; अवघ्या ५ सेकंदातच झाला मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

'काही लोकांमुळे सेना-भाजपमध्ये कटुता आली'

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, "उद्धव ठाकरेजी स्वतः काही विचार करत नाही असं आपण म्हणतो. पण तास नाही. सांगणारे लाख सांगतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर उभे राहून एकदा विचारायला हवं होतं. त्यांनी ठाकरे कुटुंब म्हणून परिणामांचा विचार करायला हवा होता".

"इतिहासात सगळ्या वेळेला राऊत असतात. पण त्यावेळी (2019 मध्ये) राऊतांचा कावा काय हे लक्षात घेऊन काही लोक वागले. जे भरीस पडले त्याचं नुकसान झालं. ते कितीही म्हणाले, काँग्रेस (Congress) सोबत गेलं की मुख्यमंत्री पद मिळेल. तरी आपण त्याचा विचार करायला पाहिजे होता. कोण कोणासाठी काम करत ते माहीत आहे", असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com