मी सामना वाचत नाही आणि दखल ही घेत नाही - चंद्रकांत पाटील

पंकजा मुंडे या भाजपाच्या प्रत्येक नेत्याची मुलगी आहे. त्यामुळे आम्ही काळजी घ्यायला समर्थ आहोत.
मी सामना वाचत नाही आणि दखल ही घेत नाही - चंद्रकांत पाटील
chandrakant patilSaam Tv

मावळ - मी सामना वाचत नाही आणि सामनाची दखल देखील मी घेत नाही अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सामनाच्या रोखठोक मध्ये राज्यसभा निवडणुकांनंतर फडणवीस आणि भाजपवर (BJP) केलेल्या टीकास्त्रावर उत्तर दिले. तर दुसरीकडे  भाजपने विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांना डावलल्याबद्दलही सामनातून टोमणे मारण्यात आलेत.

हे देखील पाहा -

यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपा हे पंकजा मुंडे यांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहेत. पंकजा मुंडे या भाजपाच्या प्रत्येक नेत्याची मुलगी आहे. त्यामुळे आम्ही काळजी घ्यायला समर्थ आहोत. बाकी कोणी त्यांची काळजी करण्याची गरज नाही अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सामनातून केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.

chandrakant patil
दिल्लीच्या गफ्फार मार्केटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ३९ गाड्या घटनास्थळी

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील नाचता येईना आंगन वाकड़ अशी टिका केली आहे. त्यांना पराभव आधी दिसला होता. त्यामुळे त्याची स्क्रिप्ट आधीच करण्यात आली होती. त्यानंतर सगळे त्या स्क्रिप्टनुसार बोलतात. त्यांच चांगल आहे की आपआपसात भांडण जरी असली तरी दिवसभर सगळे एकच वाक्य बोलत असतात. अशा शब्दत मवीआ सरकार वर त्यांनी टिका केली.चंद्रकांत पाटील हे देहू मध्ये चौदा तारखेला पंतप्रधान नरेंद मोदी येणार आहे. त्याची पाहणी करीत आले होते. दरम्यान मुख्य मंदिरात त्यांनी तुकाराम महाराज यांचेही दर्शन घेतले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com