'जहाज बुडालं तरी उद्धव ठाकरेंना वाटतय काँग्रेस, राष्ट्रवादी आपणाला वाचवेल'

'उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, काहीही करा पण आमच्या विदर्भातील जागा निवडून आणा'
Sonia Gandhi Sharad Pawar And Uddhav Thackeray,
Sonia Gandhi Sharad Pawar And Uddhav Thackeray,Saam TV

सुशांत सावंत -

मुंबई: शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यामुळे राज्यभरात चर्चांना उधाण आलं आहे. तर या सर्व प्रकरणामागे भाजपचा हात असून भाजपने शिंदे गटाच्या साह्याने शिवसेनेचे चिन्ह गोठवलं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून केला जात आहे. शिवाय आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत.

याच सर्व पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बावनकुळे म्हणाले, आयोगावर आरोप करणं हे त्यांचं काम आहे. पण निवडणूक आयोग स्वायत्त असतो, तो वस्तुनिष्ठ आधारावर काम करतात. त्यांनी मागणी केली असेल पण आयोग जो निर्णय देतील तो मान्य केला पाहिजे. त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही.

पाहा व्हिडीओ -

तर उद्धव ठाकरे खोटं बोलायला लागले आहेत, खोटं बोलणं हा त्यांचा स्वभाव नव्हता, पण आता का बोलू लागले आहेत माहित नाही. उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, काहीही करा पण आमच्या विदर्भातील जागा निवडून आणा मोदीच्या भरवशावर खासदार आले नसते तर आज 12 खासदार बाहेर आले नसते असं बावनकुळे म्हणाले.

आपल्या परिवारात मंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी शिवसेनेची वाट लावली. केवळ उद्धव ठाकरे यांच्या चुकीच्या वागण्याने ही परिस्थिती आली असल्याचा गंभीर आरोप करत आता पुन्हा एकदा आत्मचिंतन करा असा सल्ला त्यांनी ठाकरेंना दिला.

शिवाय हे आत्मचिंतन करत नाहीत, अजूनही हेकेखोरपणा सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांनी ठेवलं नाहीत. भाजप आणि शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे काम करत आहे. शिवाय पुर्ण जहाज बुडाले तरी त्यांना वाटतंय की काँग्रेस राष्ट्रवादी आपणाला वाचवेल. अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटची धावपळ करत असून ठाकरेंची ही शेवटीची लढाई आहे. त्यांचा इतिहास २०२४ च्या निवडणुकीपर्यंत संपणार आहे अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com