वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेऊन भाजपने महाराष्ट्राचं नुकसान केलं - कॉंग्रेस

मोदी सरकारने महाराष्ट्राला कमकुवत करण्याच्या व गुजरातला विकास नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राकडून ही संधी हिरावून घेतली, यात फडणवीसही होते असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेऊन भाजपने महाराष्ट्राचं नुकसान केलं - कॉंग्रेस
वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेऊन भाजपने महाराष्ट्राचं नुकसान केलं - कॉंग्रेसSaam Tv

मुंबई: जागतिक वित्तीय सेवा केंद्र (International Financial Services Centres Authority) हे मुंबईतून (Mumbai) गुजरातला (Gujrat) नेऊन भाजपने (BJP) महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे, यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) सामील होते असा गंभीर आरोप कॉंग्रेस नेते सचिन सावंतांनी (Sachin Sawant Congress) केला आहे. भारतीय अर्थमंत्रालयाची (Ministry of Finance, India) काही कागदपत्रे त्यांनी शेयर केली आहेत आणि अर्थमंत्रालयाने केलेल्या ट्विटचा संदर्भ देत त्यांनी मोदी सरकार आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. (BJP damaged Maharashtra by taking International Financial Services Centres Authority to Gujarat - Congress)

हे देखील पहा -

कॉंग्रेस नेते सचिन सावंत आपल्या ट्विट्समध्ये म्हणाले की, "केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले की गुजरात मधील GIFT-IFSC हे भारताचे प्रमुख वित्तीय सेवा केंद्र व जागतिक आर्थिक प्रवाहाचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून विकसित करण्याकरिता भारत सरकार वचनबद्ध आहे व याकरिता ₹५०० कोटी ही दिले. IFSC युपीए सरकारने मुंबईतच व्हावे हा निर्णय घेतला होता.

मुंबईसाठी जागतिक वित्तीय सेवा केंद्र (IFSCA) असण्याची संधी मोदी सरकारने महाराष्ट्राला कमकुवत करण्याच्या व गुजरातला विकास नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राकडून हिरावून घेतली. देवेंद्र फडणवीसजी मुंबईत अतिरिक्त IFSCA होईल हे गाजर देत महाराष्ट्राची फसवणूक करत होते हे अत्यंत दुःखदायक आहे.

अलीकडेच गुजरातने सर्वाधिक FDI मिळवला (एप्रिल ते मार्च २०२०-२१ - हार्डवेअर सॉफ्टवेअर श्रेणीमध्ये देशातील एकूण गुंतवणूकीपैकी 78%) ही गुंतवणूक अन्यथा महाराष्ट्रात आली असती FDI मध्ये गुजरात नेहमी 6 व्या क्रमांकावर होता व महाराष्ट्र कायम पहिला! महाराष्ट्राचे नुकसान भाजपामुळे झाले." असे ट्विट्स करत त्यांनी मोदी सरकार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेऊन भाजपने महाराष्ट्राचं नुकसान केलं - कॉंग्रेस
पाण्यासाठी आदिवासी महिलांचा संघर्ष; कडाक्याच्या थंडीतही चिमुकल्यांसह आंदोलन

दरम्यान सचिन सावंतांनी केलेल्या या आरोपांवर भाजपकडून अद्यापतरी कोणती प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमधील सुप्त संघर्ष, राजकारण, मुंबईचे महत्व कमी करण्याचा आरोप या विषयांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

Edited By: Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com