BJP Protest Against Nana Patole
BJP Protest Against Nana Patoleरोहिदास गाडगे

Nana Patole: भाजपकडून पटोलेंच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी...

Nana Patole: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठलं होतं.

खेड, पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वारंवार अपशब्दाचे टीकास्त्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंकडून टाकले जाते. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करत आज खेड तहसिलदार कार्यालयाबाहेर भाजपाकडून (BJP) नाना पटोलेंच्या (Nana Patole) प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. (BJP demands filing of treason case against Nana Patole ...)

हे देखील पहा -

मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंकडून देशाच्या पंतप्रधानाविषयी अपशब्द वापरले जात असून पटोलेंकडून पंतप्रधान नव्हे (PM Modi) तर संपूर्ण देशाचा अपमान होत असल्याची भावना भाजपाकडून व्यक्त करण्यात आली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोंलेवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करत भाजपाचे नेते अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरिक्षक, खेड तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

BJP Protest Against Nana Patole
Nana Patole: 'त्या' वक्तव्याचा सातारा, सांगली, हिंगाेली, परभणी, पालघरात BJP कडून निषेध

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठलं होतं. आता पुन्हा एकदा नवा वाद पटोलेंनी ओढवून घेत "ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं" असं बेताल वक्तव्य नाना पटोलेंनी केलं. या वक्तत्व्याचा भाजपाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, शहराध्यक्ष बाळासाहेब कहाणे, राजन परदेशी, मनोहर सांडभोर, सोपान डुंबरे, प्रितम शिंदे, संतोष सैद, मयुर होले यांच्या भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com