अंबरनाथमध्ये भाजपचं मोफत लसीकरण शिबीर

दोन दिवसात २ हजार नागरिकांना लस देणार
अंबरनाथमध्ये भाजपचं मोफत लसीकरण शिबीर
अंबरनाथमध्ये भाजपचं मोफत लसीकरण शिबीरSaam Tv

अंबरनाथ - भाजपने मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबिरात दोन दिवसात दोन हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अंबरनाथमधील गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान आणि अंबरनाथ नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ शहरात मोफत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

अंबरनाथच्या बी केबिन रोडवरील स्वानंद हॉस्पिटलमध्ये १४ आणि १५ ऑक्टोबर असे दोन दिवस हे शिबीर चालणार आहे. याठिकाणी सकाळी १० ते ५ या वेळेत नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे. आज भाजपचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

अंबरनाथमध्ये भाजपचं मोफत लसीकरण शिबीर
Ludo खेळताना जडलं प्रेम, मग लग्नासाठी हजारो किमीचा प्रवास; पण गेम फिरला अन्..

यावेळी जास्तीत जास्त लोकांना लस देण्याचं उद्दिष्ट असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान याच कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ज्या दोन जणांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या नातेवाईकांना भाजपतर्फे प्रत्येकी १ लाख रुपयांचे आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com