प्रस्थापितांची खरी वृत्ती समोर आली; OBC आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंचा Video शेयर करत पडळकरांची टीका

BJP MLA Gopichand Padalkar Slams MVA On OBC Political Reservation : मविआ सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाविनाच घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Gopichand Padalkar Slams MVA On OBC Political Reservation
Gopichand Padalkar Slams MVA On OBC Political ReservationSaam Tv

सुशांत सावंत

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला (OBC Political Reservation) स्थगिती दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं गणित बदललं आहे. सरकराने काढलेल्या अध्यादेशाला न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार का? असा सवाल उपस्थित होतोय. दुसरीकडे सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी प्रयत्नशील असल्याचं मविआ नेते वारंवार सांगतायत. याबाबत आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका केली आहे. पडळकरांनी सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ शेयर केला करत मविआ सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाविनाच घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (BJP Gopichand Padalkar Shares NCP Supriya Sule Video Slams On OBC Political Reservation)

हे देखील पाहा -

Gopichand Padalkar Slams MVA On OBC Political Reservation
Legislative Council Elections 2022: अपक्ष आमदारांची साथ मविआला की भाजपला?

प्रस्थापितांची ही खरी वृत्ती समोर आली - पडळकर

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संभाषणाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. यात सुप्रिया सुळे या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत आहेत. याचाच आधार घेत पडळकरांनी मविआ सरकारला धारेवर धरलं आहे. पडळकर म्हणाले की, "ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं वाट्टोळ करणाऱ्या प्रस्थापितांची ही खरी वृत्ती समोर आली…"एकाअर्थी मला आनंद आहे,हे ज्या पद्धतीने झालं” या विधानावरुन येणाऱ्या निवडणूका ओबीसी राजकीय आरक्षणाविनाच हे घेणार आहेत,हा त्यांचा हेतू स्पष्ट झाला. मी जाहीर निषेध करतो." असं ट्वीट करत पडळकरांनी मविआ सरकारचा निषेध केला आहे.

पडळकरांनी शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये काय?

पडळकरांनी शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत आहेत. त्यात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मध्य प्रदेशमध्ये ७ टक्के सीट ओबीसींच्या कमी झाल्या आहेत. नापास झालेल्या मुलाचा आदर्श कधीच आपण आपल्या मुलाला सांगत नाही. जो मेरीटमध्ये पास झालाय त्याचं उदाहरण आपण सांगतो. मध्य प्रदेश हे योग्य उदाहरण नाही. जिथे ओबीसींच्या सीट कमी झाल्या ते उदाहरण कसं असू शकतं. भुजबळ साहेब ओबीसी आरक्षणावर काम करतायतय. मध्यप्रदेशसारखं आपण केलं असतं तर आपल्याही ७ टक्के जागा कमी झाल्या असत्या, नुकसानच झालं असतं आपलं. देव पावला आपण मध्यप्रदेशप्रमाणे गेलो नाही, एका अर्थी मला आनंद आहे, हे ज्या पद्धतीने झालं." असं सुप्रिया सुळे या व्हिडिओत म्हणाल्या आहेत. यावरुनच पडळकरांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com