कल्याणात भाजप महाविकास आघडी सरकार विरोधात निषेध मोर्चा...

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढलेली राजकीय गुन्हेगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांवर कामगारांवर होणारा अन्याय, भ्रष्टाचार, अमरावती दंगलीचा निषेध करण्यासाठी भाजपा तर्फे कल्याण तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला
कल्याणात भाजप महाविकास आघडी सरकार विरोधात निषेध मोर्चा...
कल्याणात भाजप महाविकास आघडी सरकार विरोधात निषेध मोर्चा... प्रदीप भणगे

कल्याण : महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढलेली राजकीय गुन्हेगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांवर कामगारांवर होणारा अन्याय, भ्रष्टाचार, अमरावती दंगलीचा निषेध करण्यासाठी आज भाजपा तर्फे कल्याण तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजप आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेन्द्र पवार, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, माजी नगरसेवक मनोज राय यांच्यांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिकरी सहभागी होते.

हे देखील पहा-

या मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यलयाबाहेर महाविकास आघाडी सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी महाविकास आघडीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. स्पॉन्सर दंगल कशी घडवावी, हे अमरावती मध्ये महाविकास आघाडीने सिद्ध करून दाखवले आहे.

कल्याणात भाजप महाविकास आघडी सरकार विरोधात निषेध मोर्चा...
नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र कुस्ती केसरी पुरस्कार

इतर राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले मात्र महाराष्ट्रमध्ये अद्याप दर कमी झाले नाही, वीज बिल माफी नाही, सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या हिताचं कोनंतच काम केलं जातं नाही असा आरोप केला. मागील काही महिन्यांपासून भाजपातील नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आज संध्याकाळी मुंबईत काही माजी नगरसेवक शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधण्याची दाट शक्यता आहे. या भाजप नगरसेवकांच्या प्रस्तावित शिवसेना प्रवेशावर आमदार रविंद्र चव्हाण यांना प्रसिद्धी माध्यमांनी विचारणा केली आहे. यावर बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की,आम्हालाही आपल्याकडूनच या प्रवेशाबाबत समजले आहे.

भाजपचे कार्यकर्ते, एवढी वर्षे ज्यांनी पक्षात काम केले असे काम करणारे कार्यकर्ते सोडून जातात. त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख होत असल्याचे ते म्हणाले आहे. तर भारतीय जनता पक्ष ते का सोडून चालले आहेत, याचे कारण त्यांनाच माहीत असावे. मात्र, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख वाटते की आम्ही कुठे तरी कमी पडलो की काय? अशी खंतही आमदार चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली आहे. तसेच शिवसेना प्रवेश करणाऱ्या या नगरसेवकांना शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी दिले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com