लोकल सुरू करण्याबाबत भाजप आक्रमक

लोकलवर अवलंबून असलेले छोटे-मोठे उद्योग व्यवसायही ठप्प आहेत.
लोकल सुरू करण्याबाबत भाजप आक्रमक
लोकल सुरू करण्याबाबत भाजप आक्रमक Saam Tv news

सूरज सावंत

कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट ओसरत असल्यानं मुंबईतील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र सर्व सामान्यांसाठी मुंबईची लोकल (Mumbai Local) सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपनं आज मुंबई व ठाण्यातील (Thane) ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर 'सविनय कायदेभंग आंदोलन' (Savinay KaydeBhang Andolan) केलं. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजप पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली. (BJP is aggressive about starting local)

लोकल सुरू करण्याबाबत भाजप आक्रमक
कोरोनात गुळवेल ठरली संजीवनी, लागवडीसाठी मोदी सरकारचा पुढाकार

भाजपच्या कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेण्यात आलं. तर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दंडही ठोठावण्यात आला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात करोनाचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर मुंबई महापालिकेनं मुंबई शहर व उपनगरातील निर्बंधही उठवले आहेत. दुकानांना रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

सरकारी व खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची मुभा दिली आहे. मात्र, लोकल ट्रेन सुरू नसल्यानं नोकरदारांना नोकरीधंद्याच्या ठिकाणी पोहोचणं मुश्किल झालं आहे. रस्ते मार्गानं प्रवास करताना लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. वेळ आणि पैसे खर्च होत आहेत. लोकलवर अवलंबून असलेले छोटे-मोठे उद्योग व्यवसायही ठप्प आहेत. त्यामुळं आता करोना संसर्गाचा दर घटल्यानंतर तरी लोकल सुरू व्हावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. किमान करोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना तरी लोकल प्रवासाची मुभा द्यावी, असे मत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर व्यक्त केले.

प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी दरेकर यांनी चर्चगेट ते चर्नीरोड असा लोकलने प्रवासही केला. चर्नीरोड स्थानकावर दरेकर उतरल्यानंतर टिसींनी दरेकर यांना अडवून तिकिटाची मागणी केली. मात्र तिकिट नसल्यामुळे प्रवीण दरेकर यांना टीसींनी २६० रुपयांचा दंड ठोठावला. दरेकर यांनी स्वत: ही माहिती दिली.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.