जावेद अख्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक!

जावेद अख्तर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.
जावेद अख्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक!
जावेद अख्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक!जयश्री मोरे

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी जसे तालिबानमध्ये काही इस्लामी संघटना नागरिकांना त्रास देत आहेत धर्माच्या नावावरती तालिबानमध्ये लोकांचा छळ केला जात आहे तशा तालिबानी माणसिकतेचे लोक म्हणजेच आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आणि या संस्थांना समर्थन करणारे लोकं तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं वादर्गस्त वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं आणि यामुळेत त्यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक झाली आहे.BJP is aggressive in demanding filing of case against Javed Akhtar

हे देखील पहा-

गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तालिबानची प्रवृत्ती रानटी असून आपल्या देशातही काही संघटना त्याच प्रवृतीच्या असल्याचं सांगत आरएसएस, विश्व हिंदू परिषद, आणि बजरंग दलांवरती टीका केली होती. यामळे संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी जावेद अख्तरांच्या घाटकोपर येथील घरासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. जावेद अख्तरांचा पुतळा बनवून त्या पुतळल्याला शाईलावण्यात आली आहे तसेच जावेद अख्तरांचा फोटो असणाऱ्या पोस्टरवरती चप्पला मारण्यात आल्या.

जावेद अख्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक!
नारायण राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीही केलं नाही - खा. विनायक राऊत

दरम्यान जावेद अख्तर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. दरम्यान आज दुपारी 12 वाजता घाटकोपर चिरागनगर येथील पोलीस ठाण्यात जाऊन जावेद अख्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास महाराष्ट्र सरकारला भाग पाडणार असल्याचं राम कदम यांनी ट्वीट केले होते. मात्र राम कदमांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे राम कदम यांनी पोलिसांना जावेद अख्तरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी घरा बाहेरच निवेदन दिले आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com