Sharad Pawar: "भाजपमध्ये बहुजनांचा विचार होत नाही, भाजपला सगळे सोडून चाललेत"...

Sharad Pawar: भाजपचे माजी आमदार विजय गव्हाणे यांनी काल (बुधवारी) राष्ट्रवादीत प्रवेश केला. याबाबत आज मुंबईत कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
Sharad Pawar: "भाजपमध्ये बहुजनांचा विचार होत नाही, भाजपला सगळे सोडून चाललेत"...
NCP Supime Leader Sharad Pawar Slams To BJPSaam Tv news

मुंबई: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहिर झाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपुर राज्यात निवडणुक लढवणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचे माजी आमदार विजय गव्हाणे (Vijay Gavhane) यांनी काल (बुधवारी) राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. याबाबत आज मुंबईत कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. (BJP is not thinking for Bahujans. Everyone is leaving BJP sharad pawar slams to bjp)

हे देखील पहा -

शरद पवार यावेळी म्हणाले की, आजचा विचार हे समाजकारणाचा आणि ते आता आपण करू. परभणी हे खुप महत्वाचं आहे, शेतकरी कामगार पक्षाची सुरूवात इथून झाली. आण्णा साहेब हे मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी लोकांची मद्दत करायला सुरूवात केली. तोच विचार घेऊन विजय राव गव्हाणे हे आहेत, ते दोस्तीला खरे आहेत. गोपीनाथ मुंडे हे माझे राजकारणातील विरोधक होते, पण ते मैत्रीत खरे होते. विजय गव्हाणे त्यांच्यासोबत त्या पक्षात गेले. विजय गव्हाणेंची मला कधीही चिंता नव्हती, कारण त्यांनी भाजपचे विचार कधीच घेतले नाहीत, त्यामुळे ते इकडे येणारचं होते आणि आता ते आले यांचा मला आनंद आहे असं पवार म्हणाले.

पुढे भाजपवर (BJP) टीका करताना शरद पवार म्हणाले की, भाजपमधला विचार बद्दल आहे. भाजपमध्ये बहुजनांचा विचार होत नाही आणि हे सत्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर आम्ही जिंकणार, हे चित्र भाजपने तयार केलं, पण आता सगळे त्यांना (भाजपला) सोडून चालले आहेत. गोव्यात पण तेच होत आहे असंही पवार म्हणाले.

NCP Supime Leader Sharad Pawar Slams To BJP
नाशिक: पतंगोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोटारसायकल स्वाराचा चिरला गळा!

भाजपचे माजी आमदार विजय गव्हाणे यावेळी म्हणाले की, आज माझी घरवापसी झाली आहे. माझी राजकीय मैत्री ही स्वर्गीय प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याशी होती आणि मग मी भाजपमध्ये गेलो आणि काम केलं. गोपीनाथ मुंडेनंतर आताही भाजप तशी राहिली नाही. बहुजनमधल्या लोकांना जागाच नाही आता भाजपमध्ये असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना गव्हाणे म्हणासे की, फडणवीस हे स्टेजचे अॅक्टर आहेत. पण भाजप हे नारायण राणे, राधा कृष्ण विखे पाटील चालवतात. आमचं राजकारण म्हणजे वेगळे आहे, शाहू, फुले यांचा महाराष्ट्र घडवणारा नेता हे फक्त शरद पवार आहे. पंकजा मुंडेंबद्दस गव्हाणे म्हणाले की, पंकजा ताईंचे हाल चालले आहेत. ते त्या पक्षात (भाजपमध्ये) का आहेत, माहित नाही. मी पंकजा ताईंना विनंती करणार आहे असंही विजय गव्हाणे म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com