विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय पूजा कोण करणार ? चंद्रकांत पाटील म्हणाले...

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हवर सावध भूमिका घेतली आहे. 'त्यावर माझं खाही म्हणणं नाही, यावर माझी काही प्रतिक्रिया नाही', असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय पूजा कोण करणार ? चंद्रकांत पाटील म्हणाले...
Chandrakant Patil Saam Tv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नाराज आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेंच्या बंडखोरीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार का या चर्चेला उधाण आलं आहे. या सर्व राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हकरून बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगितल्यास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले. याच राजकीय घडामोडींवर चंद्रकांत पाटलांना पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय पूजा कोण करणार हा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर 'त्या वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पूजा करणार' असे उत्तर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले आहे. ( Chandrakant Patil News In Marathi )

Chandrakant Patil
शिवसेना, हिंदुत्व, बंडखोरांना भावनिक आवाहन; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हवर सावध भूमिका घेतली आहे. 'त्यावर माझं खाही म्हणणं नाही, यावर माझी काही प्रतिक्रिया नाही', असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सध्या राज्यात शिवसेनेची अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. या राजकीय घडामोडीवर भाजपने सावध भूमिका घेतली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगलं आहे. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निकालानंतर गुलालानंतर उधळण्यात आला आहे, आता विधानसभेची तयारी आहे का ? या प्रश्नावर 'मी हा गुलाल आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी शिल्लक ठेवला आहे', असे मिश्किल उत्तर पाटील यांनी दिले आहे.

Chandrakant Patil
उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हनंतर राऊतांनी दिली तीन शब्दात प्रतिक्रिया

दरम्यान, पाटलांना यंदा पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय पूजा कोण करणार असा प्रश्न विचारण्यात आला.त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल उत्तर दिले. 'त्या वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पुजा करणार', असे उत्तर पाटील यांनी दिले. मुख्यमंत्र्याच्या फेसबुक लाईव्हवर चंद्रकांत पाटलांनी मौन बाळगत प्रत्येक प्रश्नावर राम कृष्ण हरी असं एकच उत्तर दिलं. तसेच दोन वर्षानंतर होत आहे. वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांचं पुण्यात स्वागत करतो असेही पाटील यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यास कॉंग्रेस तयार

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यास कॉंग्रेस तयार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com