"२० तारखेपासून गुलाल वाचवलेला, आता तो कधी वापरायचा हे..." चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य

Nana Patole Slams BJP On Eknath Shinde : "२० तारखेपर्यंत गुलाल वाचवून ठेवलेला, आता तो कधी? कुठे? कसा? वापरायचा हे सांगता येत नाही." असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
Chandrakant Patil On Eknath Shinde News, Chandrakant Patil Latest News
Chandrakant Patil On Eknath Shinde News, Chandrakant Patil Latest NewsSaam Tv

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल १७ आमदार आणि पदाधिकारीही सुरतमधील एका हॉटेलात थांबले असल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "२० तारखेपर्यंत गुलाल वाचवून ठेवलेला, आता तो कधी? कुठे? कसा? वापरायचा हे सांगता येत नाही." असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. (Chandrakant Patil On Eknath Shinde News)

हे देखील पाहा -

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत बोलताना ते म्हणाले की, जे काही होतंय त्यावर आम्ही बारकाईने लक्ष देतोय. या घटनेने काही परिवर्तन होईल हे आता बोलणं योग्य होणार नाही. पण, संजय राऊतांच्या अशा भडकाऊ वक्तव्यांमुळेच शिवसेनेत अशा समस्या तयार झाल्या आहेत. तसेच संजय राऊतांनी प्रत्येक वेळी अंगावर जाऊ नये. राऊतांनी आता तरी आपली बडबड थांबवावी असा सल्ला त्यांनी संजय राऊतांना दिला आहे.

Chandrakant Patil On Eknath Shinde News, Chandrakant Patil Latest News
मोठी बातमी: एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदाराला हृदयविकाराचा झटका!

एकीकडे राज्यात एवढ्या मोठ्या राजकीय घटना घडत असताना देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, ही भाजपची परंपरा आहे. कोणत्याही निवडणुकीच्या विजयानंतर दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटून मिठाई देण्यासाठी जावं लागतं. देवेंद्र फडणवीस हे पक्षश्रेष्ठींना मिठाई देण्यासाठीच दिल्लीला गेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.

शिवसेनेचे संपर्कात नसलेले आमदार

1. एकनाथ शिंदे

2. शंभूराज देसाई

3. अब्दुल सत्तार

4. संदीपान भुमरे

5. भरत गोगावले

6. महेंद्र दळवी

7. संजय शिरसाठ

8. विश्वनाथ भोईर

9. बालाजी केणीकर

10. किमा दाबा पाटील

11. तानाजी सावंत

12. महेश शिंदे

13. थोरवे

14. शहाजी पाटील

15. प्रकाश आबिटकर

16. अनिल बाबर

17. किशोर अप्पा पाटील

18. संजय रायमुलकर

19. संजय गायकवाड

20. शांताराम मोरे

21. लता सोनवणे

22. श्रीनिवास वणगा

23. प्रकाश सुर्वे

24. ज्ञानेश्वर चौगुले

25. प्रताप सरनाईक

26. यामिनी जाधव

Edited By - Akshay Basiane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com