Kirit Somaiya : कोविड काळातील कमाईचा हिशोब द्या; किरीट सोमय्या यांनी ट्विट करत सुजित पाटकरांना केला सवाल

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत सुजित पाटकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSaam Tv

जयश्री मोरे

Kirit Somaiya News : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत सुजित पाटकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. सोमय्या यांनी सुजित पाटकर यांना संजय राऊत यांचा पार्टनर म्हणत आरोप केले आहे. कोविड काळातील कमाईचा हिशोब द्या, असा सवाल किरीट सोमय्या यांनी सुजित पाटकर यांना केला आहे. (Latest Marathi News)

किरीट सोमय्या यांनी सुजित पाटकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांचा आरोप आहे की, तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने (BMC) २०२० मध्ये सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला सुमारे अर्धा डझन मेगा कोविड सेंटर चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले'.

'१०० कोटींच्या कॉन्ट्रॅक्टसाठी ६००० वैद्यकीय आणि अर्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती, त्यावेळेला लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडे त्यांच्या पॅरोलवर फक्त १८ कर्मचारी होते. १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देताना ही कंपनी अस्तित्वातच नव्हती, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला होता.

दरम्यान, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आरोप केल्यानंतर आता ट्विट करत सवाल केला आहे. सोमय्या यांनी ट्विट करत संजय राऊत यांचे पाटनर सुजित पाटकर यांनी कोवीड मध्ये कमाई केली त्याचा जवाब द्या. बोगस बिलांविरुद्ध 2.32 कोटी भरले. ते पैसे कुठे गेले? लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने बेनामी खात्यात 14 कोटी हस्तांतरित केले त्याचे पैसे कुठे गेले? असा सवाल सोमय्या ट्विट करत केला आहे.

Kirit Somaiya
Sanjay Raut : शिंदेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही; उद्धव ठाकरे पहिल्या पाचमध्ये होते, राऊतांचा घणाघात

दरम्यान, आज सोमवारी बेस्ट, एम पी एंटरप्राईसिस, किश कॉर्पोरेटच्या विरोधात चालक आणि कर्मचारी निदर्शने करणार आहेत. चालक आणि कर्मचारी हे किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करणार आहे. आज दुपारी बेस्ट कुलाबा मुख्यालय समोर निदर्शने करण्यात येणार आहे .

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com