शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरेंनी घोटाळ्यांवर उत्तरे द्यावीत; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

Kirit somaiya on Uddhav thackeray : उद्वव ठाकरेंच्या सभेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
BJP leader kirit somaiya has criticized cm uddhav Thackeray over various scam of shivsena leaders
BJP leader kirit somaiya has criticized cm uddhav Thackeray over various scam of shivsena leaders Saam Tv

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईच्या बीकेसीमध्ये सभा आहे. या सभेसाठी शिवसेनेनं जोरदार तयार केली आहे. या सभेला महाराष्ट्रासहित इतर राज्यातूनही शिवसैनिक येणार आहेत. सदर सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना या सभेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, उद्वव ठाकरेंच्या या सभेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Kirit somaiya on Uddhav thackeray)

हे देखील पाहा -

किरीट सोमय्या म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंना सभा घेण्याची फार इच्छा आहे. त्यांनी या सभेत अनेक घोटाळ्यांवर उत्तरे द्यावीत. त्यांनी रश्मी ठाकरे यांचे एकोणीस बंगले, नंदकिशोर त्रिवेदी यांचं मनी लॉड्रिंग, प्रताप सरनाईक यांची ३५ कोटींची संपत्ती, यशवंत जाधव यांची संपत्ती, अनिल परब यांचं बेकायदेशीर रिसॉर्ट, भावना घोटाळा यांवर उत्तरे देण्याची इच्छा ठेवावी. तसेच तुमचा गृहमंत्री तुरुंगात आहे. मनसुख हिरेन यांची हत्या ही तुम्ही नियुक्त केलेल्या गैरकायदेशीर पोलीस अधिकाऱ्यानं केली, यावर उद्धव ठाकरेंनी उत्तरे द्यावी'. शिवसेनेच्या नेत्यांच्या कथित घोटाळ्यांचा पाढा सांगत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रियेचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.

BJP leader kirit somaiya has criticized cm uddhav Thackeray over various scam of shivsena leaders
पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवक्त्याच्या कानशिलात भडकावली

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आज मुंबईच्या गिरगावमधील स्थित गोल देऊळ मंदिराला भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सोमय्या म्हणाले की, 'गोल देऊळ हे ऐतिहासिक मंदिर आहे. स्वतःला हिंदू म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अपमान केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच दोन दिवसांसाठी या गोल मंदिराचा घंटानाद बंद झाला. पोलिसांनी घंटा काढायला लावला, आरतीच्या वेळी देखील घंटानाद नव्हता. मुद्दा ध्वनी प्रदूषणाचा होता, तर हजारो मशिदीतून सकाळी पावणे पाच वाजता भोंग्याचा आवाज उद्धव ठाकरेंना ऐकायला येत नव्हतं का, असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. पुढे सोमय्या म्हणाले की, 'मी बजरंग बलीला सांगायला आलोय की, आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांना माफ करा. त्यांनी शंकराची हर हर महादेव बंद करायला लावलं, कशामुळे तर ही मुस्लिम वस्ती आहे. सध्या ते दिल्लीच्या सोनिया मातेच्या चरणी गेले आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सर्वस्व आहे. त्यामुळे घंटानाद करत महादेवाची माफी मागितली, असा टोला देखील सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com