'उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारचे दिवस भरले'; किरीट सोमय्यांची टीका

विधानपरिषदेच्या या निवडणुकीत भाजपचे राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे
'उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारचे दिवस भरले'; किरीट सोमय्यांची टीका
kirit somaiya Saam Tv

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे काही निकाल हाती आले आहेत. राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेची निवडणूक देखील चुरशीची सुरू आहे. विधानपरिषदेची निवडणूक ही खरी लढत दहाव्या जागेसाठी होती. या जागेवर भाजपचे प्रसाद लाड (Prasad Lad) आणि काँग्रेसचे भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे. विधानपरिषदेच्या या निवडणुकीत भाजपचे राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे विजयी झाले आहेत. या विधानपरिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Maharashtra Politics News In Marathi)

विधानपरिषदेच्या निवडणुकीत चुरशीची लढत भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने ही विधानपरिषद निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत विजयी होण्यसाठी अपक्ष आमदार आणि घटक पक्षांच्या आमदारांना भाजपच्या नेत्यांनी भेटगाठी घेतल्या. भाजप नेत्यांच्या या भेटीगाठींना यश प्राप्त झाले आहे. सध्या विधानपरिषदेच्या दहाव्या जागेवर भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. याच दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'विधान परिषद निवडणूक निकाल म्हणजे ठाकरे सरकारचा निकाल.उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारचे दिवस भरले', अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

kirit somaiya
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत घट, मुंबईलाही किंचित दिलासा, पण....; आजची आकडेवारी पाहाच

दरम्यान,आज विधानपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत आतापर्यंत शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर विजयी झाले आहेत. तर भाजपचे राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, विजयी झाले आहेत. विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी काँग्रसेचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे हे दोन्ही गॅसवर आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com