
मुंबई : शिवसेनेनं शिवसंपर्क अभियानाची सभा मुंबईच्या बीकेसी मैदानात घेतली. या सभेत शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तोफ भाजप नेत्यांवर धडाडली. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहित केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुंबई स्वतंत्र्य करायची आहे, असा आरोप केला. या उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. (BJP Leader Prasad Lad on CM Uddhav thackeray Speech)
हे देखील पाहा -
शिवसेनेनं शिवसंपर्क अभियानाअंतर्गत बीकेसी मैदानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाबरी मशिद, अयोध्याच्या मुद्यावरून जोरदार टीका केली. तसेच ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुंबई स्वतंत्र्य करायची आहे, असा आरोप देखील केला. या आरोपावर भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. ठाकरेंच्या आरोपावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. प्रसाद लाड म्हणाले, 'होय आम्हाला मुंबई भ्रष्टाचाऱ्यांपासून स्वतंत्र करायची आहे, होय आम्हाला वसुलीजीवी लोकांपासून मुंबई स्वतंत्र करायची आहे. होय आम्हाला मुंबईकरांच रक्त पिणाऱ्या बांडगुळांपासून मुंबई स्वतंत्र करायची आहे, असं ट्विट करत शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे. हे ट्विट प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टॅग केलं आहे. त्यामुळं शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया येणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.