खरा हिटलर कोण? पवार की ठाकरे, संजय राऊतांनी सांगाव; भाजप नेत्याचा सवाल

'ज्यांनी रामाचे नाव घेतले त्या रामाच्या नावावर देशद्रोहाचा गुन्हा टाकायचा याला राजेशाही म्हणायचं की हिटलरशाही'
खरा हिटलर कोण? पवार की ठाकरे, संजय राऊतांनी सांगाव; भाजप नेत्याचा सवाल
Sharad Pawar/Uddhav ThackeraySaam TV

सुशांत सावंत -

मुंबई : मोदींना हिटलर म्हणणाऱ्यां संजय राऊचांना सांगू इच्छितो हिटलरशाही, नाझीशाही फक्त महाराष्ट्रात चालते. राणा दाम्पत्य, संदीप देशपांडे, सदावर्ते यांची उदाहरण समोर आहेत. ज्यांनी रामाचे नाव घेतले त्या रामाच्या नावावर देशद्रोहाचा गुन्हा टाकायचा याला राजेशाही म्हणायचं की हिटलरशाही आणि या राज्यातील हिटलर शाहीच्या मागे खरा हिटलर कोण आहे. संजय राऊत आहेत, उद्धव ठाकरे की शरद पवार हे देखील राऊतांनी सांगाव असं वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज राष्ट्रीय मिल मजदुर संघ हॉल, परळ येथील सोशल मीडिया (Social Media) सैनिक मेळाव्यात बोलताना पंतप्रधान मोदींवर गंभीर टीका केली होती. ते म्हणाले, हिटलर हा लोकप्रिय नेता होता, बाळासाहेब ठाकरेंच्याही तो आवडता होता. आताचे पंतप्रधानही हिटलर सारखेच आहेत. जो कोणी विरोधात बोलेल त्यावर राजद्रोहाचा खटला होऊ शकतो. हिटलर म्हणायचा सामान्य माणूस विचारवंत नसतो. हिटलरला इव्हेंट फार करायचा जे आता मोदी (Narendra Modi) करतात. मोदी हे पूर्णपणे हिटलरला फॉलो करतात अशी टीकासंजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर केली होती.

हे देखील पाहा -

या राऊतांच्या टीकेला आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी उत्तर देत राज्य सरकारचं हिटलरशाही प्रमाणे वागत असल्याचं म्हंटलं आहे. तर इथून पुढे पंतप्रधान नरेंद्र मोंदींबाबत एकही अपशब्द खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी राऊतांना दिला आहे.

तसंच ज्या प्रमाणे बाबराने हल्ले केले तसं हे सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर हल्ले करत असून त्यांनी राणा, सदावर्ते आणि संदिप देशपांडे यांच्यावरील कारवाई केली ती कोणत्या प्रकारची आहे. असा सवालही उपस्थित करत या सर्व प्रकारामागचे खरे हिटलर संजय राऊत आहेत की उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Uddhav Thackeray and Sharad Pawar) आहेत हे राऊतांनी सांगावं असही लाड म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.