'काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना हिंदुत्वापासून फार दूर गेली आहे'

'शिवसेनेचा आजचा अयोध्या दौरा हा हिंदुत्वादी जनतेला जवळ करण्यासाठीचा प्रयत्न'
'काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना हिंदुत्वापासून फार दूर गेली आहे'
Uddhav ThackeraySaam TV

मुंबई : हिंदुत्वापासून शिवसेना (Shivsena) फार दूर गेली आहे, आजचा अयोध्या दौरा हा हिंदुत्वादी जनतेला जवळ करण्यासाठीचा प्रयत्न असून, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना हिंदुत्व विसरली असल्याची टीका भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर केली आहे.

शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. ते अयोध्येला गेल्यानंतर त्यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली. त्यांच्या या दौऱ्यामुळे सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत (Congress And NCP) सत्तेत असणारी शिवसेना आपण हिंदुत्व विसरलो नसल्याचा संदेश वारंवार देत असते. तोच संदेश आजत्या या दौऱ्यामधून देण्यात येत असतानाच,आदित्य यांच्या आजच्या दौऱ्यावर भाजपनेते प्रविण दरेकरांनी टीका केली आहे.

हे देखील पाहा -

दरेकर म्हणाले, हिंदुत्वपासून शिवसेना फार दूर गेली आहे, अयोध्या दौरा हा हिंदुत्वादी जनतेला जवळ करण्यासाठी प्रयत्न असून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेली शिवसेना हिंदुत्व विसरली असल्याचं दरेकर म्हणाले. ते आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) ईडी चौकशी संदर्भात वक्तव्य केलं ते म्हणाले, 'कायदा सगळ्यांसाठी समान आहे. राहुल गांधींनी तपास यंत्रांना सामोरं जावं. ED कारवाई करते याचा अर्थ राहुल गांधी यांच्या वरील आरोपावर तथ्य असावे, कोणावर ही काहीही आरोप करण्यापेक्षा तपास यंत्रणांना सामोरे जावं असं ते म्हणाले.

शिवाय ओबीसी आरक्षण योग्य मिळावे, इम्पेरिकल डेटा (Imperial data) योग्य व्हावा ही जबाबदारी सरकारची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवल्यानंतर आता सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ बोलत असल्याचंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com