Hijab Controversy : हिजाब घातल्याने विद्यार्थिंनींना परीक्षेसाठी प्रवेश नाकारला; मुनगंटीवार म्हणाले...

मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याने प्रवेश नाकारण्यात आला आहे. याप्रकरणी एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwarsaam tv

भूषण शिंदे

मुंबई : वाशिममध्ये काल NEET चा पेपर घेण्यात आला. त्यात हजारो विद्यार्थ्यांनी पेपर दिला. मात्र, वाशिममधील (Washim) मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याने प्रवेश नाकारण्यात आला आहे. याप्रकरणी एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sudhir Mungantiwar News In Marathi )

Sudhir Mungantiwar
मुख्यमंत्री नातवाला भेटायला चार तास घालवतात, पण...; खडसेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

मुनगंटीवार म्हणाले, 'प्रत्येक शाळेमध्ये काही नियम आहेत. त्या नियमानुसार विद्यार्थ्यांना गणवेश घालावा लागतो. आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य आहे. पण ते शाळेच्या नियमाच्या आड आले नाही पाहिजे. एखाद्या धार्मिक संस्थेने असा जर आग्रह धरला तर, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. धार्मिक स्वातंत्र्य आणि इतर नियम वेगळे ठेवले पाहिजेत'.

दरम्यान, यावेळी मुनटगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुनगंटीवार म्हणले, 'महाराष्ट्रात दुर्दैवाने या राज्याचे मुख्यमंत्री मागील अडीच वर्षात मंत्रालयात आलेच नाहीत. रंजल्या गांजल्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्रिपद भूषवायचे असते. मात्र, मुख्यमंत्री अडीच वर्षात मंत्रालयात आलेच नाहीत'.

Sudhir Mungantiwar
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! आजी-माजी आमदार 'पिता-पुत्र' एकनाथ शिंदे गटात सामील ?

दरम्यान, वाशिममधील हिजाब प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं. 'गणेवशामध्ये परीक्षा देण्याचा न्यायालयाचा निर्णय आहे. त्याचं उल्लंघन कोणी करू नये, असं मत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com