Rahul gandhi News
Rahul gandhi NewsSaam tv

Video: राहुल गांधींची शिवरायांशी तुलना केल्याचा आरोप; 'त्या' व्हिडिओवरून भाजप आक्रमक

भाजपने या व्हिडिओमध्ये राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा आरोप केला आहे .

Rahul Gandhi News: काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काँग्रेसने त्यांच्या ट्विटरवरील अधिकृत हँडलवरून राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर केला आहे. भाजपने या व्हिडिओमध्ये राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा आरोप केला आहे . भाजपच्या या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. (Latest Marathi News)

कर्नाटकात काँग्रेसने मुसंडी मारल्यानंतर पक्षाचा विश्वास दुणावला आहे. कर्नाटकात काँग्रेसने सरकार स्थापन केल्यानंतर पक्षाने राहुल गांधींचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओवरून राजकीय वर्तुळात राजकारण पेटलं आहे. भाजपने या व्हिडिओत राहुल गांधींची तुलना शिवरायांशी केल्याचा आरोप आहे.

Rahul gandhi News
2000 Note Exchange RBI : 2000 रुपयांच्या नोटांवर मोठी अपडेट, स्वतः रिझर्व्ह बँकेनेच कोर्टात सांगितले, ही नोटबंदी नाहीच!

राहुल गांधी यांच्या व्हिडिओवरून राजकारण पेटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या व्हिडिओ विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बावनकुळे यांनी काँग्रेसने माफी मागण्याची मागणी केली आहे.

या व्हिडिओवर मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 'मी व्हिडिओ पाहिलेला नाही. या जगात कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे कठीण आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राहुल गांधींची तुलना काँग्रेस करत असेल तर त्यांचं बौद्धिक दिवाळे निघाले आहे. हेच काँग्रेसवाले आहेत, जे औरंगाजेबाचे उद्दातीकरण करत होते'.

या व्हिडिओवरून काँग्रेसचे नेते अतुल लोंढे म्हणाले, राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान यांचे राज्यपाल करत होते, तेव्हा हे काय बोलले? चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान केला, तेव्हा ते काय बोलले. यांनी राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपचे काम आहे'. राहुल गांधी यांच्या या व्हिडिओवरून वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायाला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com