Chandrakant Patil : 'सीमेवर जाऊन सैनिकांचे भांडे धुण्याची सेवा करेल'; चंद्रकांत पाटील असे का म्हणाले?

मंत्री चंद्रकांत पाटील यांना राजकीय संन्यास घेण्याचे संकेत देत आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारं वक्तव्य केलं आहे
Chandrakant Patil
Chandrakant Patil Saam TV

सचिन जाधव

Chandrakant Patil News : मंत्री चंद्रकांत पाटील राजकीय संन्यास घेण्याचे संकेत देत आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारं वक्तव्य केलं आहे. 'मला जेव्हा केव्हा सांगतील, तेव्हा मी राजकारणातून संन्यास घेईल आणि सीमेवर जाऊन सैनिकांचे भांडे धुण्याची सेवा करेल, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

Chandrakant Patil
Rohit Pawar : 'बाबाची बडबड मध्यप्रदेशात खपेल, पण...'; धीरेंद्र शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून रोहित पवार भडकले

पुण्यात भाजपने (BJP) सन्मान स्त्री शक्तीचा मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात भाजप महिला पदाधिकारीही उपस्थित होते. या कार्यक्रमात स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मला राजकीय संन्यास घेण्यास सांगतील, तेव्हा मी राजकारणातून संन्यास घेईल. त्यानंतर सीमेवर जाऊन सैनिकांचे भांडे धुण्याची सेवा करेल. मला यासाठी बायकोचाही पाठिंबा आहे'.

देशावरील आक्रमणावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'इसवी सन शून्य ते १२शे वर्ष देश गुण्यागोविंदाने चालला. मात्र नंतर दृष्ट लागली आणि आक्रमण येत गेली. त्यांनी या देशाचा सत्यानाश केला, त्यात अनेकजणांना डोक होतं. देशातील हिंदू पुरुष लढवय्या आहे, पण तो दोन गोष्टीनी खचून जातो,त्या म्हणजे त्याचा देव भ्रष्ट झाला आणि त्याची स्त्री भ्रष्ट झाली,म्हणून त्यांनी अभ्यास करून मंदिर तोडली मुर्त्या पाण्यात टाकल्या'.

Chandrakant Patil
उत्तर प्रदेशात महिला आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार...; जितेंद्र आव्हाडांची CM योगी आदित्यनाथ यांच्यावर आगपाखड

'राम आमचा महापुरुष आहे असं आम्ही मानतो. आक्रमण येत गेले, इंग्रज डोकेबाज होते म्हणून त्यांनी राज्य केलं. काहींनी अभ्यास करून मूर्त्या तोडल्या महिला भ्रष्ट केल्या', असे चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com