
नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर दाखल झालेले गुन्हे हा एक राजकीय षडयंत्राचा भाग असून, २५ वर्षात समाजकारणात आणि राजकारणात ज्यांचे उद्दिष्ट साध्य झाले नाहीत त्यांनीच अन्यायकारक पध्दतीने माझ्यावर गुन्हे दाखल केले असल्याचं नाईक सांगितलं. (Ganesh Naik Latest Marathi News)
एका महिलेने आमदार गणेश नाईक यांच्यासोबत २७ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता. शिवाय नाईकांपासून आपणला एक १५ वर्षाचा मुलगा असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होत. तसंच तो मुलगा ५ वर्षांचा झाल्यानंतर मुलाचा आणि त्याच्या आईचा आपण अधिकृतपणे स्वीकार करू असं आश्वासन नाईक यांनी दिलं होते. मात्र, नंतर नाईक यांनी आपला शब्द न पाळता आपली फसवणूक केल्याचा आरोप संबंधीत महिलेकडून करण्यात आला होता. तसंच आपल्यावर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केल्याची तक्रार या महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात (Nerul Police Station) केली होती.
दरम्यान, या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली शिवाय पोलिसांनी नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नाईक यांनी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आश्चर्य़ाची बाब म्हणजे आरोप करणाऱ्या पीडित महिलेने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करणार असल्याच काही दिवसांपुर्वी माध्यमांसमोर सांगितलं आहे.
अशातच आता अटकपुर्व जामीन मंजूर झाल्यावर आमदार गणेश नाईक यांनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मागिल काही दिवसांपासून माझ्याबाबत जे काही सुरु आहे. त्याबद्दल माझी प्रतिक्रिया, मत काय आहे ते मिडीयासमोर मी विनम्रपणे सांगतो की, माझ्यावर गुन्हे दाखल झाले ते एक षडयंत्र आहे. उच्च न्यायालयाने (High Court) मला यातून मोकळं ठेवलं आहे. मी या सगळ्या प्रकरणाला सामोरं जाणार असून जे काही राजकीय षडयंत्र आहे. ते सर्व खोटं आहे काळाच्या ओघात यातील सत्य बाहेर येईल आणि दूध का दूध, पाणी का पाणी होईल असं नाईक म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.