
सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. जवळपास महिन्याभरानंतर पहिल्यांदाच नाईक सार्वजनिकरीत्या समोर आले आहेत. नाईक (Ganesh Naik) यांनी आज मनपा आयुक्तांची भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली. नाईक यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आणि जीवे ठार मारण्याची धमकी देण्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर ते अनेक दिवस भूमीगत होते. अखेर त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. (BJP MLA Ganesh Naik reactivated after getting bail meet to the commissioner)
हे देखील पाहा -
काय आहे प्रकरण?
एका महिलेने गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर आरोप केले आहेत. महिलेने सांगितल्यानुसार, ते दोघे गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. तसेच नाईक यांच्यापासून आपल्याला एक मुलगा झाला असून त्याचे वय पंधरा वर्ष आहे. नाईक यांनी त्या महिलेला ग्वाही दिली होती की, हा मुलगा पाच वर्षांचा झाल्यानंतर मुलाचा आणि त्याच्या आईचा आपण अधिकृतपणे स्वीकार करू. मात्र नंतर नाईक यांनी आपला शब्द पळाला नाही आणि त्या महिलेची फसवणूक केली. त्यानंतर नाईकांकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध केला. मात्र, नाईक यांनी आपल्यावर जबरदस्ती करून वारंवार अत्याचार केला, अशी तक्रार पीडित महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी नाईक यांच्या विरोधात शनिवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला. (Ganesh Naik Latest News in Marathi)
महिलेने दाखल केलेल्या अर्जात मागणी केली होती की, नाईक आणि त्यांचा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, मात्र नाईक त्यांचे पितृत्व स्वीकार करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यामुळे या महिलेकडून आपल्या हक्काची मागणी होऊ लागल्यानंतर गणेश नाईक यांनी मार्च 2021 मध्ये तिला बेलापूर येथील सेक्टर-15 मधील आपल्या कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यावेळी महिलेने नाईक यांना विनंती केली होती की, आपल्या मुलाला स्वीकारा. परंतु नाईक यांनी या महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिला ठार मारण्याची धमकी दिली. महिलेच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गणेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस (Police) निरीक्षक अनिल पाटील करत आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.