भाजपच्या मंदा म्हात्रेंकडून उद्धव ठाकरेंचे कौतूक (व्हिडिओ)

एका बाजूला राज्यातले भाजपचे नेते महाविकास आघाडी आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार करत असतानाचा दुसऱ्या बाजूला भाजपच्याच आमदार मंदा म्हात्रे यांनी वेगळा सूर काढला आहे
मंदा म्हात्रे - उद्धव ठाकरे
मंदा म्हात्रे - उद्धव ठाकरे- Saam Tv

नवी मुंबई : एका बाजूला राज्यातले भाजपचे BJP नेते महाविकास आघाडी Maha Vikas Aghadi आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर टीकेचा भडीमार करत असतानाचा दुसऱ्या बाजूला भाजपच्याच आमदार मंदा म्हात्रे यांनी वेगळा सूर काढला आहे. गणेश नाईक Ganesh Naik यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंडभरुन कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. BJP Mla Manda Mhatre Praises CM Uddhav Thackeray

''कोणी काहीही आरोप करीत असले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे काम समाधानकारक आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सत्ताधारी पक्षांप्रमाणेचे विरोधी पक्षातील आमदारांना वेळ देतात, त्यांचे म्हणणे ऐकून घेतात आणि त्यांची कामेही करतात, असे प्रतिपादन बेलापूर मतदारसंघातील भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आज करुन सरकारच्या विरोधात गळा काढणाऱ्या भाजप नेत्यांची अक्षरशः बोलती बंद केली.

ऐरोलीचे आमदार गणेश नाईक सर्वसामान्य नागरिकांचे काम करीत नसल्याने ऐरोली मतदारसंघातील नागरिक अनेक समस्या घेऊन माझ्याकडे येत आहेत. त्यामुळे यापुढे ऐरोलीतील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला. BJP Mla Manda Mhatre Praises CM Uddhav Thackeray

''नवी मुंबईतील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली, त्या प्रत्येक वेळी त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. मुख्यमंत्री हे पूर्ण राज्याचे आहेत,'' असे त्या म्हणाल्या.

Edited By - Amit Golwalkar

मंदा म्हात्रे - उद्धव ठाकरे
Breaking: साईसंस्थानच्या अधिकाऱ्या सह इतर सहा जणांना अटक...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com