पक्षादेश पाळणं आमच्या रक्तात; आजारी अवस्थेतही आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी रवाना

मागील काही दिवसांपासून आजाराने त्रस्त असणाऱ्या पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.
पक्षादेश पाळणं आमच्या रक्तात; आजारी अवस्थेतही आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी रवाना
Vidhan Parishad Election: BJP MLA Mukta Tilakसचिन जाधव

सचिन जाधव -

पुणे : आज विधान परिषदेच्या ((Vidhan Parishad) १० जागांसाठीचं मतदान सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे भाजप आणि महाविसाक आघाडीने आपली पुर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. एक एक मत किती महत्वाचं आहे. हे आपल्या आमदारांना ते सतत हॉटेलमध्ये पटवून देत आहेत.

शिवाय आपल्या पक्षाचं एखाद मतदान बाद होऊ नये यायाठी मतदानाची रंगीत तालीम घेतली जात आहे. तर मतदान पक्षालाच करा यासाठी पक्षांनी पक्षादेश देखील जाहीर केले आहेत. (Vidhan Parishad Election)

त्यामुळे आजच्या निवडणुकीत एका आमदाराच्या मताला महत्व आहे. यासाठीच मतं गोळा करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप (BJP) दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू असतानाच मागील काही दिवसांपासून आजाराने त्रस्त असणाऱ्या पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी पुण्याहून (Pune) मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. शिवाय पक्षाला आपली गरज असून, पक्षादेश पाळणं आमच्या रक्तात असल्यामुळे आपण मतदानासाठी जात असल्याचे मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी सांगितलं आहे.

हे देखील पाहा -

राज्यसभेच्या (RajyaSabha) निवडणुकीवेळी आजारपणात असलेले पुण्यातील आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी मतदान केल्यामुळे विजयाची माळ आपल्या गळ्यात पडली असल्याची भावना भाजपने व्यक्त केली होती. भाजपनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यसभेचा विजय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला होता.

अशातच आज होणाऱ्या विधान परिषदेच्या मतदानासाठी देखील टिळक पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झाल्या असून पक्षाला गरज असल्यामुळे मी मतदानासाठी जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, मतदान करताना चुका करु नका अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना दिल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com