'नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती'

भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केला आहे.
Nitesh Rane Vs Uddhav Thackeray
Nitesh Rane Vs Uddhav ThackeraySaam TV

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत (ShivSena) ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. गट आणखीच मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेना पदाधिकाऱ्यांसह आता नगरसेवकांनाही आपल्या गटात सामील करून घेत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे शिवसेनेला पुन्हा नव्याने उभारणी देत आहे. अशातच नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. (Uddhav Thackeray Latest News)

Nitesh Rane Vs Uddhav Thackeray
बंडखोरांची राजकीय तिरडी उठवणारच; संजय राऊतांचा हल्लाबोल

नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली. त्यावेळी त्यांना त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिली होती. असा खळबळजनक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ट्विट करून नितेश राणेंनी हा आरोप केलाय.

नितेश राणे यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरू करू असा इशाराही आमदार नितेश राणेंनी दिला आहे. (BJP Nitesh Rane Latest News)

एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजसोबत हातमिळवणी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच भाजपच्या काही नेत्यांकडूनही शिवसेनेवर टीका केली जात आहे.

त्यातच एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच नितेश राणेंनी ट्विट करत पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती असा आरोप केला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com