
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं. 'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही', असं कोश्यारी यांनी म्हटलं. कोश्यारी यांच्या या विधानावरून सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्यपालांचं समर्थन केलं आहे. (Bhagat Singh Koshyari News)
मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही.. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे..त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात.. असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
नितेश राणे म्हणाले की, राज्यपाल काहीच वावगं बोलले नाही. त्यांनी मुंबईच्या उत्कर्षात योगदान देणाऱ्या त्या त्या समाजाची आठवण करून दिली. राज्यपालांनी कुणाचा अपमान केला असता तर आम्ही बोललो असतो. त्यांनी त्या त्या समाजाच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला असं मला बिलकूल वाटत नाही. (Nitish Rane Latest News)
महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतला समाचार
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. मुंबईचा विकास सगळ्यांनी केला असून रतन टाटा, फिरोज मेहता आता जे उद्योगपती होते. त्यांनी मिळून मुंबई घडवली. असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल कमी आणि एका पक्षाचा कार्यकर्ता जास्त वाटत आहेत. असं म्हणत पेडणेकर यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. राज्यपालांनी जे वक्तव्य केलं त्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्र लोकांमध्ये काम करणारे लोकं आहेत. आज दुबईत मराठी किंग आहे. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पडस्पर्शाने पवन झालं आहे. आपला महाराष्ट्र आपली मुंबई सगळ्यांना पोट भरण्यासाठी आणि सामावून घेण्यासाठी आहे.असंही पेडणेकर म्हणाल्या.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.