...तर असे गठ्ठे करण्याची वेळ आली नसती; प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

Pravin Darekar On Uddhav Thackeray : शिवसैना पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचं प्रतिज्ञापत्र शिवसेना घेत आहे. अशात भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या अनेक वक्तव्यांचा समाचार घेतला आहे.
Pravin Darekar And Uddhav Thackeray
Pravin Darekar And Uddhav ThackeraySaam TV

सुशांत सावंत

मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या आपला पक्ष वाढवण्यासाठी चांगलेच अॅक्टीव्ह झाले आहेत. सोबतच आदित्य ठाकरेही निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात फिरतायत. बंडखोरांवर आणि भाजपवरही उद्धव ठाकरे जोरदार टीका करतायत. सोबतच शिवसेना आपल्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचं प्रतिज्ञापत्र घेत आहे. अशात भाजपचे आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी उद्धव ठाकरेंच्या अनेक वक्तव्यांचा समाचार घेतला आहे. "सत्ता असताना फिरले असते तर, असे गठ्ठे करण्याची वेळ आली नसती" अशी बोचरी टीका प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. (Pravin Darekar Latest News)

हे देखील पाहा -

भाजप आमदार शिवसेनेवर टीका करत म्हणाले की, कुणी कुणाला संपवत नसतं, ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिलाय त्यांची प्रतारणा झाली की असं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादी ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा तिरस्कार केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा ही अधोगती झाली अशी बोचरी टीका त्यांनी केली. त्याचप्रमाणे भाजपला अशी फूट पाडण्याची आवश्यकता नव्हती, पक्षप्रमुख आणि शिवसेनेच्या आमदारांचे मतभेद झाले आणि त्यातून सेनेत फूट पडली असंही म्हणात त्यांनी शिवसेनेच्या फूटीसाठी शिवसेतील मतभेद जबाबदार असल्याचा पुर्नउच्चार केला.

Pravin Darekar And Uddhav Thackeray
Arujn Khotkar : खोतकरांची ठाकरेंसोबतची निष्ठा अखेर तुटली; रावसाहेब दानवेंनी भरवला पेढा

शिवसेना आपल्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाशी एकनिष्ठ असल्याबाबत पत्र लिहून घेतले आहे. याबाबत ते म्हणाले की, पुन्हा नव्याने शपथ पत्र घेऊन पक्ष घट्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, पण सत्ता असताना फिरले असते तर असे गठ्ठे करण्याची वेळ आली नसती असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने हे सरकार अस्तित्वात आले तेव्हापासून जनता खुश आहे, शिंदे-फडणवीस सरकरच्यामागे बाप्पा उभा राहील असं म्हणत देवांनाही कळतं कुणाच्या मागे आशीर्वाद द्यावा अशी टोमणा त्यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस ही जोडी राज्याला दिशा देईल. महाराष्ट्र् आणि मतदारसंघाच्या भविष्यासाठी ही जोडी टिकली पाहिजे असंही दरेकर म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com