Sanjay Raut : 'संजय राऊतांचं नाव; इतिहासातलं खुशामतगिर म्हणून अव्वल राहील'

'पंतप्रधान मोदी बांधत असलेलं सेंट्रल व्हीस्टा हे नव संसद भवन असो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असो की काशीचं भव्य दिव्य मंदीर असो. हे सर्व तुमचा जळफळाट करणारच आहे.'
Sanjay Raut : 'संजय राऊतांचं नाव; इतिहासातलं खुशामतगिर म्हणून अव्वल राहील'
Sanjay Raut : 'संजय राऊतांचं नाव; इतिहासातलं खुशामतगिर म्हणून अव्वल राहील' Saam TV

सुशांत सावंत -

मुंबई : जनाब संजय राऊत, तुमचं इतिहासातलं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहीलं, कारण आपल्या सारखा ‘खुशामतगिर’ परत होणे नाही. अशी टीका भाजपा आमदार राम कदम यांनी संजय राऊतांवरती (Sanjay Raut) केली आहे. 'कदाचित त्यामुळे आपल्याला ‘प्राईड व्ह्युल्यु ‘काय असते ? हे समजण्याची तुमची कुवत नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदी (Narendra Modi) बांधत असलेलं सेंट्रल व्हीस्टा (Central Vista) हे नव संसद भवन असो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असो की काशीचं भव्य दिव्य मंदीर असो. हे सर्व तुमचा जळफळाट करणारच आहे.' असही सातपुते म्हणाले.

Sanjay Raut : 'संजय राऊतांचं नाव; इतिहासातलं खुशामतगिर म्हणून अव्वल राहील'
CM Uddhav Thackeray: मुख्यंमंत्री पुन्हा येणार! शिवाजी पार्कवर प्रत्यक्षात हजर राहणार...

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील समस्यांबद्दलही लिहत चला. वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा टक्का उच्चशिक्षण व संशोधनात वाढावा या साठी बार्टीसारख्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु या आघाडी सरकारच्या कामचुकार धोरणामुळे तिचा उद्देशच नष्ट होतोय. यामुळे ५१८ विद्यार्थ्यांच्या मुलाखती होऊन वर्ष उलटून गेलं तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेल्या नाहीत. यावर आपण कधी बोलणार की, वंचीत नेहमी वंचीतच राहिले पाहिजे, हे काँग्रेसचच धोरण आपण राबवणार आहात असा सवालही सातपुते ( Ram Satpute ) यांनी राऊतांना विचारला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.