हे फोटो कोणत्या बगीच्यातले?; भाजपच्या युवा आमदाराचा शिवसेनेला सवाल
मुंबई: खासदरा नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या लीलावती हॉस्पिटलमधील MRI करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली आहे. काल शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने लीलावती हॉस्पिटलला जावून याबाबत जाब विचारला. आता भाजपचे आमदार राम सातपुते यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे जूने रुग्णालयातील उपचार घेत असताने फोटो ट्वीट केले होते. यावर बोलताना राम सातपुते म्हणाले की मागील काही दिवसांपासून शिवसेना कन्फ्युज आहे. (Ram Satpute Latest Marathi News)
कोणत्या विषयावर बोलायचं हे त्यांना कळत नाहीये, रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारत आहेत. कोरोना (COVID-19) काळात मुंबईत मृतदेहाचे खच पडले, आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात लहान बालकं दगावली. त्यावेळी शिवसेनेने हॉस्पिटल प्रशासनाला जाब का विचारला नाही?. एका खासदाराचा फोटो आला तर लगेच जाब विचारला. हॉस्पिटलमध्ये फोटो बाहेर येऊ नयेत यावर त्यांचा आक्षेप आहे. म्हणून मी संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो ट्विट केले असल्याचे सातपुरते म्हणाले आहेत.
''शिवसेनेने हॉस्पिटल मधल्या फोटो वर बोलण्याअगोदर हे फोटो zoom करून बघून सांगाव ते कोणत्या बगीचा मध्ये काढले आहेत?'' असे ट्वीट राम सातपुते यांनी केले आहे. रुग्णालयात नवनीत राणा यांचे एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना तिथली व्हिडीओ शुटींग आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोप्रकरणी मुंबई महापालिकेने लिलावती रुग्णालयाला आता नर्सिंग कायद्याखाली नोटीस बजावली आहे. इतकंच नाही तर, 48 तासांत याचे उत्तर द्या असे निर्देश मुंबई महापालिकेने दिले आहेत.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.