Hindu Janakrosh Morcha: 'छत्रपती संभाजीराजे धर्मवीरचं' पुण्याच्या जनआक्रोश मोर्चात शिवेंद्रराजे कडाडले

धर्मांतर आणि लव जिहादविरोधी कायद्याच्या मागणीसाठी आज (२२, जानेवारी) पुण्यातही हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
Shivendraraje Bhosale Ajit Pawar
Shivendraraje Bhosale Ajit PawarSaamtv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे

Pune: गेल्या काही दिवसांपासून राज्यात धर्मांतर आणि लव जिहादविरोधी कायद्याच्या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. याच प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील विविध शहरांमध्ये जोरदार आंदोलनेही करण्यात आली होती. आज (२२, जानेवारी) पुण्यातही हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह तुकाराम महाराजांचे वंशजही सहभागी होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. (Pune News)

Shivendraraje Bhosale Ajit Pawar
Rohit Sharma: रोहितचा जबरा फॅन! चालू सामन्यातचं मैदानावर धावला अन् मारली मिठी, रोहितच्या कृतीने जिंकली मने, Video Viral

असा असेल मोर्चाचा मार्ग:

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पुण्यामध्ये सकाळी 10 वाजता हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दहा वाजता या मोर्चाला लाल महालापासून सुरुवात होणार असून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा जाणार आहे. या मोर्चात वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार आहेत.

साताऱ्याचे भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैय्या, संत तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारीही या मोर्चात सहभागी होणार आहेत.

Shivendraraje Bhosale Ajit Pawar
Mumbai : ठरलं! शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार; उद्या उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर अधिकृत घोषणा करण्याची शक्यता

वाहतुकीत बदल:

मोर्चा लाल महाल येथे जमण्यास सुरुवात झाल्यावर फडके हौद चौकाकडून येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तर मशाल यात्रेस जिजामाता चौक येथे गर्दी झाल्यानंतर आवश्यकतेनुसार, शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जावे लागेल.

शिवेंद्रराजे काय म्हणाले:

यावेळी बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी "छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच आहेत. महापुरूषांवर बोलण्याएवढे आपण मोठे नाही, त्यावर बोलू नये, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. (Ajit Pawar) तसेच या मागण्या पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवणार" असल्याचेही सांगितले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com