Girish Bapat Dies: भाजप खासदार गिरीश बापट अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ७२ वर्षी बापट यांनी अखेरचा श्वास घेतला.
Girish Bapat News
Girish Bapat NewsSaam tv

Girish Bapat Passed Away : पुण्यातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे भाजप खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ७२ वर्षी बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. याच रुग्णालयात आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर सायंकाळी ६ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत. पुणे आणि कसबा मतदारसंघात भाजप (BJP) पक्षाचा विकास करण्यासाठी त्यांनी अनेक परिश्रम घेतले.

गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास

गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने तेव्हा प्रारंभ झाला जेव्हा ते आणीबाणीच्या काळात तुरुंगात शिक्षा भोगून आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी बापट यांनी यशस्वीपणे पार पडली.

Girish Bapat News
BJP खासदार Girish Bapat यांचं निधन, वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

१९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते नगरसेवक झाले. त्यानंतर सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात बापट आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले.

त्यानंतर त्यांनी 1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली आणि पुढे सलग पाच टर्म निवडून आले. भाजपने 1996 साली त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण त्यावेळी बापट यांचा पराभव झाला होता.

Girish Bapat News
Girish Bapat last Interviews | शेवटच्या मुलाखतीमध्ये Girish Bapat सगळ्यांवर नाराज?

2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com