मुंबईत भाजप-शिवसेना संघर्ष पेटणार ? आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आखली नवी रणनिती

आशिष शेलारांना भाजप मुंबईची जबाबदारी मिळताच भाजप आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. भाजपने थेट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मतदारसंघात दहीहंडीचे आयोजन केले आहे.
ashish shelar and aditya thackeray
ashish shelar and aditya thackeray saam tv

Ashish Shelar News : भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar ) यांना भाजपकडून मुंबईची जबाबदारी मिळाली आहे. आशिष शेलारांना भाजप मुंबईची जबाबदारी मिळताच भाजप आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. भाजपने थेट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मतदारसंघात दहीहंडीचे आयोजन केले आहे. भाजप वरळीतील जांभोरी मैदानावर दहीहंडी उभारणार आहे. या मैदानावर सचिन अहिर यांची दहीहंडी असते. मात्र,या मैदानावर भाजपने दहीहंडीचे आयोजन केल्याने भाजप-शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ashish shelar and aditya thackeray
Ambadas Danve | राज्यसरकारावर टीका करताना पाहा काय म्हणाले अंबादास दानवे?

वरळीतील जांभोरी मैदानावर दरवर्षी शिवसेना आमदार सचिन अहिर यांच्याकडून दहीहंडीचे आयोजन केलं जाते. वरळीचे आमदार हे आदित्य ठाकरे आहेत, त्यांच्यच मतदारसंघातील जांभोरी मैदानावर भाजपने दहीहंडीचे आयोजन केले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

भाजपने जांभोरी मैदानावर दहीहंडीचे आयोजन केल्यानंतर यावर भाष्य करताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'जांबोरी मैदानात जनतेचे पैसे खर्च झाले आहेत. म्हणून आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, कार्यक्रम आयोजित करू नका. त्यामुळे मैदानाची दुर्दशा होईल. पण चांगलं झालेलं मैदान आदित्य ठाकरे यांनी केलं, म्हणून भाजपकडून दहीहंडी आयोजित केली जात आहे. आदित्य ठाकरे यांनी मैदान केलं म्हणून गालबोट लावण्यासाठी असं केलं जातं आहे. जनता सगळं ओळखून आहे. जनतेच्या पैशातून ते मैदान बनवलेलं आहे. त्यावर भाजप असं करत असेल तर चुकीचं आहे'.

ashish shelar and aditya thackeray
सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अजितदादांनी शिंदे गटातील आमदारांना फटकारलं

दरम्यान, शिवसेना विधानपरिषद आमदार सुनिल शिंदे यांनी देखील भाजपच्या दहीहंडी आयोजनावर प्रतिक्रिया दिली आहे. सुनिल शिंदे म्हणाले, 'वरळीत मी स्वत: दहीहंडीचं आयोजन करत होतो. जांभोरी मैदान दोन-अडीच कोटी खर्च करून नव्याने तयार करण्यात आलं आहे. आता जांभोरी मैदानात पुन्हा आयोजित केली तर या मैदानाची दुर्दशा होईल. गोविंदा असो किंवा अन्य अन्य कोणत्याही माध्यमातून प्रयत्न केले तरी वरळी शिवसेनापासून तुटणार नाही. सध्या भाजपचे सुरु असलेले दहीहंडी आयोजनाचे प्रयत्न बालिश आहे'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com