अमिनिटी स्पेस भाड्याने देण्यावरुन भाजप-राष्ट्रवादीमध्ये जुंपली

अमेनिटी स्पेस खाजगी विकासकांना देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे
अमिनिटी स्पेस भाड्याने देण्यावरुन भाजप-राष्ट्रवादीमध्ये जुंपली
अमिनिटी स्पेस भाड्याने देण्यावरुन भाजप-राष्ट्रवादीमध्ये जुंपलीSaam Tv

पुणे - पुण्यामध्ये Pune अमिनिटी स्पेस amenity space खाजगी विकासकांना भाड्याने देण्यावरुन सुरु झालेले राजकारण काही संपण्याची चिन्हे नाहीत, या मुद्द्यावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजप BJPआणि राष्ट्रवादी काँगेसमध्ये NCPचांगलीच जुंपली आहे, यातील बहुतांश जागा कोथरुड विधानसभा मतदार संघातल्या असल्याने कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरच थेट राष्ट्रवादीने आरोप केला आहे. पुण्यात काँग्रेस राष्ट्रवादीने अमिनिटी स्पेस लाटल्या, 15 टक्के आरक्षण 5 टक्क्यांवर आणले असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

अमेनिटी स्पेस खाजगी विकासकांना देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. सुरवातीपासूनच या निर्णयाला राष्ट्रवादी ने विरोध केला नंतर काही अटींवर राष्ट्रवादीचा होकार देखील मिळवला मात्र पुन्हा राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलत विरोध कायम ठेवला. या इतक्या नाट्यानंतर आता पुन्हा अमेनिटी स्पेस खाजगी विकासकांना देण्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपचे आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

हे देखील पहा -

सत्ताधारी भाजपने एकूण 185 अमेनिटी स्पेस विक्रीला काढल्या आहेत. त्यापैकी 74 अमेनिटी स्पेस या कोथरूड विधानसभा मतदार संघातल्या असल्याने राष्ट्रवादी ने थेट चंद्रकांत पाटील यांच्यावरच आरोप केला आहे. कोथरुडकरांच्या आरक्षणाच्या जागा विक्रीला काढणे म्हणजे नागरिकांची फसवणूक असल्याचा आरोप राष्ट्रवादी ने केला आहे.

अमिनिटी स्पेस भाड्याने देण्यावरुन भाजप-राष्ट्रवादीमध्ये जुंपली
जमिनीच्या मोबदल्यासाठी बेळगावच्या डॉक्टरचे सांगोल्यात उपोषण...

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अमेनिटी स्पेस लाटल्या याची यादीच 2 दिवसात जाहीर करतो असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. मविआ सरकारने 15 टक्क्यावरून  वरून 5 टक्के अमिनिटी स्पेस आणल्या, म्हणजे 10 टक्क्यांची चोरी केली, 10 टक्के बिल्डरच्या घशात घातल्या असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मोक्याच्या जागी असणाऱ्या अमेनिटी स्पेसचा फायदा पुणेकरांना होणे तर दूरच पण भाजप आणि राष्ट्रवादीच्या भांडणात प्रत्यक्ष कमला सुरवात होण्यास विलंब होतो आहे  हे मात्र खरं.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com