पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वादाला नव्याने फोडणी !
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वादाला नव्याने फोडणी !Saam Tv

पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वादाला नव्याने फोडणी !

चंद्रकांत पाटील पुण्यात आल्यापासून महापालिकेत भ्रष्टाचार वाढला, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप; राष्ट्रवादीच्या आरोपाला भाजपकडूनही प्रत्युत्तर

पुणे - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrkant Patil हे पुण्याच्या Pune कोथरूडमधून Kothrud आमदार झाल्यापासून महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने BJP महापालिकेतील संस्कृतीच बदलून टाकली असून भ्रष्टाचार वाढला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप Prashant Jagtap यांनी केला आहे. महापालिकेत सध्या विविध टेंडर प्रक्रिया सुरू असून त्यावरून जगताप यांनी हा निशाणा साधला आहे. मनमानी कारभार आणि पाशवी बहुमताच्या जोरावर स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी शेकडो कोटींच्या टेंडर्सना मंजुरी देत  पुणेकरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचेच काम भाजपकडून सुरू आहे, असंही जगताप म्हणाले आहेत. 

हे देखील पहा -

तर या आरोपांना खोचक उत्तर देत भाजपने देखील राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. निविदांना राष्ट्रवादीचे स्थायी समितीचे सदस्य एकमताने पाठिंबा देतात तर जगताप वेगळीच भूमिका मांडतात. त्यामुळे हा आरोप राष्ट्रवादने  अंतर्गत वादातून केला असल्याचा पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे. या आरोप प्रत्यारोपणामुळे पुण्यातील वातावरण मात्र चांगलंच तापले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com