या जळत्या चितांचा प्रकाशही तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहचत नाही का? नितेश राणे मुख्यमंत्र्यांवर कडाडले

Nitesh Rane On CM Uddhav Thackeray : निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगलेत अंस म्हणत नितेश राणेंनी या घटनेसाठी शिवसेना नेत्यांना जबाबदार ठरवले आहे.
या जळत्या चितांचा प्रकाशही तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहचत नाही का? नितेश राणे मुख्यमंत्र्यांवर कडाडले
Nitesh Rane On CM Uddhav ThackeraySaam Tv

सुशांत सावंत

मुंबई: मुंबईतील वांद्रे परिसरात काही दिवसांपुर्वी एक इमारत कोसळली होती. यात एकाचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा (Illegal construction) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईतील अनधिकृत बांधकांनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात नितेश राणेंनी अतिशय खोचक भाषेत मुख्यमंत्र्यांवर टीका करत त्यांना धारेवर धरलं आहे. (BJP nitesh Rane Slams ShivSena Cm Uddhav Thackeray illegal Construction in bandra mumbai)

हे देखील पाहा -

निष्पापांच्या रक्ताने शिवसैनिकांचे हात रंगलेत: नितेश राणे

भाजप आमदार नितेश राणेंनी पत्राच्या सुरुवातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणे आपल्या पत्रात म्हणाले की, सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीनं राज्य चालतं. सध्याची मुंबईची अवस्था पाहता कुणीही अस्वस्थ होऊ शकतो. गुन्हेगारीचं साम्राज्य, भ्रष्टाचाराची दलल वाढत वाढत सामान्य मुंबईकरांच्या उंबऱ्यापर्यंत पोहचली आहे. तुम्ही देखील मुंबईचे रहिवाशी असल्याने ढिसाळ कारभाराची राड तुमचा उंबरा एकनाएक दिवस ओलांडणारच होती. झालं ही तसंच, गुरुवारी ९ जूनला तुमच्या निवास्थानाहून हाकेच्या अंतरावर असलेल्या वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशीर बांधकाम कोसळलं. १७ जण जीवन मरणाशी लढा देत आहेत. ४० वर्षीय युवकाचा बळी गेला. त्या कटुंबांनी फोडलेल्या टाहोने संबंध मुंबईच्या काळाजाचा थरकाप उडाला. आपण मात्र तिथं भेट देऊन विचारपूस करण्याचीही तसदी घेतली नाही. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की त्या निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगलेत अंस म्हणत नितेश राणेंनी या घटनेसाठी शिवसेना नेत्यांना जबाबदार ठरवले आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिमा हवालदिल करणारी

नितेश राणे पुढे म्हणाले की, सत्तेची लालसा आणि अधिक मतांची लालसा जिवघेणी ठरते आहे. मुंबईबाहेरील लोकांच्या मतांच्या लोभात अनाधिकृत बांधकामांना तुमचे नगरसेवक परवानी देतात. मुंबईत १४ फुटांच्या वर वाढीव बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाची मेहर नजर असल्यानं ही बांधकामं राजरोज सुरु आहेत. अनाधिकृत बांधकामं वाढत वाढत खारफुटी जागांवर पोहचली आहेत. त्यामुळं जीवाशी खेळ करत तिथं दोन-दोन मजली झोपडपट्ट्या उभारल्या आहेत. वारंवार अनधिकृत बांधकामं ढासळत आहेत. यात लोकांचा जीव बळी जातोय. आपण मात्र शांततेत हा मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्यानं पाहत आहात. यामुळं निर्माण होणारी तुमची असंवेदनशील मुख्यमंत्र्यांची प्रतिमा सामान्यांना हवालदिल करणारी आहे अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.

Nitesh Rane On CM Uddhav Thackeray
मुंबईच्या वरासह वऱ्हाड्यांची धुलाई; लग्न मोडलं, वधूचं दुसरं लग्नही लागलं! पाहा नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री ठराविक पक्षाचे?

अनधिकृत बांधकामांवर टीका करताना नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवरच सवाल उपस्थित केला आहे. नितेश राणे आपल्या पत्रात पुढे म्हणाले की, वर्षभरापुर्वी मालाड मालवणीमध्ये घराचं वाढीव अनाधिकृत बांधकाम ढासळून ११ जणांचा बळी गेला. मानखुर्दमध्येही असंच प्रकरण घडलं. या जळत्या चितांचा प्रकाशही तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहचत नाही का? असा खोचक सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कुणाचीही गय करु नका. असे आदेश आपण दिलेत, मात्र आयुक्त कारवाई करत नाहीयेत असा आरोपही त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, अनधिकृत बांधकामांना दिली जाणारी परवानगी जीवघेणी ठरतीये. राजकीय आकसापायी विरोधकांना अनधिकृत बांधकामांच्या नोटीसी पाठवण्यात दाखवली जाणारी तत्परता, अनधिकृत बांधकांमांवर हातोडा चालवण्यातही दाखवावी. अन्यथा मुख्यमंत्री जनतेचे नसून ठराविक पक्षांच्या पदाधिकारी नगरसेवकांसाठी आहे की काय? असा संदेश जनमानसात दृढ होईल अशी खोचक टीका वजा इशारा नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com